त्यावेळी माझा मुलगा लहान होता.तो खूपच गप्पा मारायचा.समोर अनोळखी अबोल व्यक्ती असली तरी तो त्याला प्रश्न विचारून बोलायला भाग पाडायचा! वयाच्या मानाने त्याचे बरेचसे प्रश्न इतके मुद्देसूद असायचे की समोरच्या माणसाची बोलती बंद व्हायची. आमच्या बिल्डींगमधेच एका नव्यानेच बी ए एम एस झालेल्या डॉक्टरांनी दवाखाना चालू केला होता. त्या डॉक्टरांचे जे काही पहिले लकी पेशंट होते त्यापैकी हा एक होता.थोडक्यात, याच्या गप्पागोष्टीमुळे त्यांचा हा लाडका पेशंट होता.किरकोळ तक्रारींसाठी आम्ही त्याला त्यांच्याकडे घेवून जायचो.जेव्हा कधी त्यांच्याकडे जायचो याच्यासाठी वेटींग करायची गरज भासायची नाही! डॉक्टर त्याला डायरेक्ट आत बोलवायचे.त्यालाच प्रश्न विचारून औषधे ठरवायचे आम्ही फक्त तो बरोबर सांगतोय ना एवढेच बघायचो. हे डॉक्टर पुढे तेथून घर बदलेपर्यंत आमचे फॅमिली डॉक्टर होते.अगदी परिवाराच्या सदस्याप्रमाणे आमचा स्नेह अनेक वर्षे होता.
एकदा आमच्या या बाळाला किंचित ताप आला होता म्हणून या डॉक्टरसाहेबांकडे जायचे ठरवले. आम्ही तयार होइपर्यंत हा खाली त्यांच्या दवाखान्यात पोहोचला होता. मी दवाखान्यात पोहोचलो तर हा तिथल्या रिसेप्शनवर असलेल्या बाईला प्रश्न विचारत होता.
" काका अजून का नाही आले?"
" अरे बाळा आज ते येणार नाहीत."
" का नाही येणार?"
" अरे आज त्यांना ताप आलाय!"
" काका डॉक्टर आहेत ना?'
" हो रे बाळा..."
" डॉक्टरला ताप कसा काय येईल?"
" अरे डॉक्टर सुध्दा आजारी पडतो की!"
" खोट नका सांगू, काकांना कसा ताप येईल, डॉक्टर कधी आजारी नाही पडतं काही!"
त्याने हे वाक्य अशा काही अविर्भावात म्हटले की त्या बाईला काही बोलावे हे कळेनाच! मी पुढे जावून त्याला समजावले पण त्याचे म्हणणे कायम होते ...
" डॉक्टर कधी आजारी पडत नाही!"
शेवटी मी हार मानली आणि त्याला डॉक्टरकाका आल्यावर त्यांनाच विचार असे समजावून घरी नेले. क्रोसीन देवून त्याला झोपवले.तो बरा झाला.पुढे दोन तीन दिवस तो सारखा खाली जावून डॉक्टर आलेत का बघत होता.तिसऱ्या दिवशी एकदाचे काका सापडले.त्याला डॉक्टर आजारी पडू शकतो हे पटलेले नव्हते! तो डायरेक्ट डॉक्टरच्या केबीनमधे घुसला. दोन्ही हात मागे बांधून त्याने विचारले ...
" काका, डॉक्टर कधी आजारी असतात का?"
" हो, कधी कधी आजारी पडतात की!"
" तुम्हाला ताप आला होता?"
" हो आला होता ना!"
आता मात्र हा बिघडला ...
" मग तुम्ही कसले डॉक्टर ???"
मोठा प्रश्न फेकून तो सरळ घरी आला.
पुढचे दोन दिवस त्याला" डॉक्टर म्हणजे शेवटी माणूसच असतो, त्यालाही आजारपण येवू शकतं, त्यांच्यापेक्षा मोठ्या जास्त शिकलेल्या डॉक्टरांच्याकडे जावून औषध घ्यावे लागते!" हे समजावले तेव्हा कुठे त्याचे प्रश्न संपले!
Happy Doctors Day!
..... प्रल्हाद दुधाळ.

No comments:
Post a Comment