जानेवारीचा आज पहिला दिवस,2017 चे स्वागत करताना गेल्या वर्षी अनुभवलेल्या कडूगोड प्रसंगांची कितीही नको म्हटलं तरी मनात दाटी झालीय.काही अपवाद वगळता 2016 खूपच संस्मरणीय झालय.अनेक मित्र या वर्षी जोडले.अनेक आनंदी क्षण साजरे केले.मागच्या वर्षी या दिवशी मनाशी विचार करत होतो सेवानिवृत्त व्हायला अजून साडेचार वर्षे आहेत;पण आज त्यातलेही एक वर्ष कमी झाले.यापुढे साडेतीन वर्षानंतरच्या नियोजनाचा विचार करायला हवा.आजपर्यंतच्या आयुष्यात शून्यातून छोटेसे विश्व साकारताना मनातल्या अनेक आकांक्षांना मूरड घालावी लागली.कधी पैशाची तर कधी वेळेची गणिते जमली नाहीत.आता मात्र त्या राहून गेलेल्या गोष्टींची यादी करायला हवी असे मनापासून वाटायला लागले आहे.सामान्य जीवन जगणार्या माणसांचे बहूदा असेच होत असावे.जेव्हा प्रचंड वेळ आणि उत्साह असतो तेव्हा खिसा खाली असतो आणि आयुष्यात सगळ काही स्थिरस्थावर होईपर्यंत वयाचा एक असा टप्पा पार केलेला असतो की हे आता आपण करू शकू का? ते आपल्याला झेपेल का?या वयात काही पोरकटपणा केला तर कुणी आपली खिल्ली तर उडवणार नाही ना? "सब मनके खेल!"
आपण तर ठरवलंय बुवा कोण काय म्हणेल याचा विचार न करता मनात राहून गेलेल्या गोष्टी करून टाकायच्या! अस नको व्हायला की "चने आहेत पण दात नाहीत" नाही का?
______ प्रल्हाद दुधाळ.
आपण तर ठरवलंय बुवा कोण काय म्हणेल याचा विचार न करता मनात राहून गेलेल्या गोष्टी करून टाकायच्या! अस नको व्हायला की "चने आहेत पण दात नाहीत" नाही का?
______ प्रल्हाद दुधाळ.
No comments:
Post a Comment