पुर्वी गावाकडे नवरात्रात देवळासमोर लोककलावंत आपली हजेरी लावायला यायचे. त्या दहा दिवसाच्या उत्सवात तमाशा कलावंतही लोकांच्या मनोरंजनासाठी नाचगाणी करत असायचे. एक ढोलकीवाला, एक पेटीवादक व दोन तीन कलावतीणी असा हा ताफा असायचा .काही शौकीन मंडळी तेथे नाचनाऱ्या व गाणाऱ्या त्या तमाशा कलावंतीना दौलतजादा करायचे. हे शौकीन हातात त्या काळी रुपया दोन रुपयांचे बंडल घेवून बसायचे. कलावंतीण नाचत आणि लावणी म्हणत त्या शौकीन धेंडासमोर यायची, तो एकावेळी एकच नोट तिच्या हातावर ठेवायचा ती नोट घेवून ती नाचत नाचत जावून पेटीवादकाच्या जवळ ठेवायची.पुन्हा गाणे गात व नाचत त्या शौकिनासमोर जायची. तो आनखी एक नोट तिच्या हातात सरकावायचा,परत ती नाचत नाचत पेटीवाल्याकडे यायचीत्या शौकीन माणसाकडील सगळ्या नोटा संपेपर्यंत हा खेळ ( का छळ!) चालत रहायचा! मग दुसरा एखादा शौकीन हाच खेळ करत रहायचा! मध्यरात्रीपर्यंत त्या कलावंतीणीची पार दमछाक झालेली असायची! सध्या सामान्य लोकांची अवस्था नेमकी त्या नाचगाणी करणाऱ्या कलावंतीणी सारखी झाली आहे. पळत पळत बॅंकेत किंवा पैसे असतील त्या एटीएमवर जायचे दोन हजाराची नोट मिळवायची नाचवत नाचवत घरी न्यायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच तिकीटावर(डेबीटकार्ड / क्रेडीटकार्ड/ चेकबूक) तोच खेळ!
गेला महिनाभर कधी नोट मिळतेय तर कधी रिकाम्या हाताने पळावे (नाचावे) तर लागतेच आहे! हो की नाही?
....... प्रल्हाद दुधाळ .
गेला महिनाभर कधी नोट मिळतेय तर कधी रिकाम्या हाताने पळावे (नाचावे) तर लागतेच आहे! हो की नाही?
....... प्रल्हाद दुधाळ .
No comments:
Post a Comment