एका जिद्धीची गोष्ट...
ही गोष्ट एकोणिसशे एकोण्णवदची आहे.माझ्या टेलिफोन इन्स्पेक्टर या पदावर झालेल्या प्रमोशननंतर मला मुंबईत बांद्रा येथे सहा महिन्याचे एक ट्रेनिंग पुर्ण करावे लागणार होते. खात्यातर्फे आमची या ट्रेनिंगच्या काळात रहाण्याची सोय सहारा येथील खात्याच्या क्वार्टर्समधे केलेली होती.
चार जणात आम्हाला दोन बेडरूमची एक क्वार्टर रहायला दिलेली होती. मला ज्या क्वार्टरमधे जागा मिळाली होती तेथे माझ्याबरोबर एक सिल्वराज नावाचा तामीळभाषीक व्यक्ती रहाणार होता. टिपिकल मद्रासी असलेल्या या सिल्वराजला फक्त तामीळ भाषा व काही प्रमाणात इंग्रजीशिवाय कोणतीच भाषा येत नव्हती.
सिल्वराजला हिंदी भाषेचा किंचितही गंध नव्हता त्यामुळे त्याच्याशी संवाद साधणे आम्हालाच काय; पण बांद्रा ट्रेनिंग सेंटरच्या इन्स्ट्रक्टर लोकांनाही अवघड जात होते.त्यात तो नेमका माझा रूममेट होता, त्यामुळे त्याला माझ्याशी आणि मला त्याच्याशी बोलणे अगदी आवश्यकच झाले होते!.
तो त्याच्या त्या तामीळी हेलात व मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत मला सतत काहीतरी विचारत राहायचा आणि मी माझ्या मराठी स्टाईल इंग्रजीत त्याची उत्तरे द्यायचा प्रयत्न करायचो!
लवकरच अशा तोडक्या मोडक्या का होईना होणाऱ्या संवादामुळे आम्ही दोघे चांगले मित्र झालो.त्याला उत्तम तांत्रिक ज्ञान होते;पण भाषेची समस्या त्याला चांगलीच सतावत होती.त्याचे प्रमोशन हे महाराष्ट्र सर्कलच्या वेकन्सी साठी होते त्यामुळे ट्रेनिंग नंतर त्याला महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यात राहून काम करावे लागणार होते!
याला मराठी वा हिंदी शिकल्याशिवाय महाराष्ट्रात कसे काय काम करता येणार? तो पब्लिकशी कसा बोलेल? बोलताना काय काय मजेशीर प्रसंग घडतील? यावरून सगळे ट्रेनीज त्याची चेष्टा करायचे आणि खो खो हसायचे. त्याला आमची भाषाच समजत नसल्याने केलेली मस्करीही त्याला समजायची नाही, आणि तोही आम्ही हसतोय ते पाहून काहीतरी जोक झाला असेल असं समजून हसायचा!
एकदा ट्रेनिंग सेंटरच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्याला भर क्लासमधे येवून हिंदी येत नाही यावरून भरपूर फायरिंग केले.ते त्याला चांगलेच फटकारत होते...
" इफ यू आर नॉट एबल टू अंडरस्टॅन्ड लोकल लॅंग्वेज; देन हाऊ यू कॅन वर्क इन व्हिलेज? यू मस्ट लर्न हिंदी, ऑदरवाईज यू विल बी सेंट बॅक टू चेन्नई ऑन युवर ओरिजनल पोस्ट, यू विल नॉट गेट प्रमोशन!"
हे फायरिंग सिल्वराजच्या चांगलेच जिव्हारी लागले होते.त्या दिवशी तो रात्रभर खूपच अस्वस्थ होता. सकाळी मी त्याला समजावले ..
" यू कॅन लर्न हिंदी इजिली, डोंट टेक टेंशन,व्हाटएव्हर आय कॅन डू फॉर यू,आय विल हेल्प यू फॉर द सेम !"
मी दिलेल्या मानसिक आधाराने तो थोडा शांत झाला.
दुसऱ्या दिवशी तो मला घेवून मुंबईच्या फोर्ट एरियात गेला.त्याने पुस्तकांच्या दुकानातून व फुटपाथवरून माझ्याशी सल्लामसलत करून हिंदीची अगदी प्रायमरी लेवलची व देवनागरी लिपीच्या अक्षरओळखीपासूनची पुस्तके खरेदी केली.हिंदी अंकलिपी,इंग्रजी ते हिंदी दररोजच्या वापरातला शब्दकोश तसेच सोप्या सोप्या भाषांतराची तसेच चित्ररूप गोष्टींची अशा भरपूर पुस्तकाची खरेदी त्याने त्या दिवशी केली!
दुसऱ्या दिवशी त्याने ट्रेनिंग क्लासमधे समोर जाऊन डिक्लेअर केले ...
" लिसन, आय टेल यू विथ चॅलेंज दॅट- आय विल स्पिक फ्ल्युएंट हिंदी विथिन ए मंथ!"
सगळा क्लास त्याच्या त्या चँलेंजने चिडीचूप झाला....
आणि मग सिल्वराजने ट्रेनिंगचा अभ्यास सोडून रात्रंदिवस फक्त हिंदीच शिकायचा ध्यास घेतला. क्लासमधे भेटेल त्याला इंग्रजी शब्दांचे हिंदी प्रतिशब्द,त्या शब्दांचे वाक्यात उपयोग इत्यादी गोष्टी विचारत होता.जे काही समजेल ते आत्मसात करत होता.प्रश्न विचारून विचारून त्याने मला आणि बाकी रूम पार्टनर्सना अगदी भंडावून सोडले होते...
खरं सांगतो ,त्याच्या त्या इंग्लिश टू हिंदी आणि हिंदी टू इंग्लिश कसरतीमुळे मलाही दोन्ही भाषांचा चांगलाच सराव झाला!
पंधरावीस दिवसातच तो दिसेल त्याच्याशी मोडके तोडके हिंदी बोलू लागला.
एकेकाळी हिंदीचा बिल्कूल गंध नसलेला सिल्वराज लवकरच चांगले हिंदी बोलू लागला, समजू लागला.त्याची ती जिध्द खरच वाखाणण्याजोगी होती!
कमाल म्हणजे ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी सिल्वराजने चक्क हिंदीतून आपले मनोगत व्यक्त केले!
ट्रेनिंग सेंटरच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्याच्या या प्रगतीचे खास कौतुक केले!
पुढे त्याचे पोस्टींग गोव्यात झाले.पाचेक वर्षे तो महाराष्ट्र सर्कलमध्ये राहीला आणि पुढच्या प्रमोशनच्या वेळी तामिळनाडूला बदली घेवून गेला....
त्याच्याशी पुढे संपर्क राहिला नाही;पण जिद्ध असेल तर माणसाला अशक्य काहीच नाही याचं जितंजागतं उदाहरण म्हणून सिल्व्हराज कायमचा लक्षात राहिला...
©प्रल्हाद दुधाळ.

No comments:
Post a Comment