Friday, April 4, 2014

आनंदी माणूस.

आनंदी माणूस.
                    काही माणसंच अशी असतात की त्यांच्या नुसत्या आजूबाजूला असलेल्या आस्तीत्वामुळे इत्तरांना मनाची प्रसन्नता लाभते.आनंद उत्साह अगदी त्यांच्या नसानसात भरून वाहात असतो.ते कायम सकारात्मक विचार करत असतात.संकटात असलेल्यांच्या मदतीला ते धावून जातात.प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे त्यांच्यामुळे आनंदाचा दरवळ आजूबाजूला पसरत असतो.अशा माणसाला कुठले ना कुठले दु:ख असणारच पण त्याचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर वा वागण्या बोलण्यात नसतो.स्वत: तर ते सतत आनंदात असतातच पण तो आनंद सगळ्यांनाच कसा मिळेल असे पहातात, इत्तरांची काळजी घेतात, सर्वांना अशा माणसाचा  खूप आधार वाटतो.असा माणूस आपल्या सभोवती असणे म्हणजे आपले  भाग्यच! मला वाटते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी माणूस नक्कीच  असतो! फक्त गरज आहे त्याला ओळखण्याची! एकदा का असा माणूस तुम्हाला सापडला की तुमचे आयुष्यही अखंड आनंदाने भरून जाते! जरा शांतपणे विचार करून पहा, असा माणूस तुमच्या स्वत:च्या आतच आहे! त्या दृष्टीने स्वत:चे एकदा आत्मपरीक्षण करून तर बघा! लक्षात येईल की उगीच इकडे तिकडे शोधायची गरजच नाही असा एक माणूस जो आनंद वाटू शकतो आनंदात जगू शकतो तुमच्यातच आहे. त्याला ओळखा.हे खर आहे की आनंदी, समाधानी राहण्याची एक कला आहे ही कला प्रत्येकांनी आत्मसात करून घ्यावयास हवी.

                                                       ....प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment