Wednesday, April 16, 2014

वृत्ती-1

वृत्ती-1

“ माझं ही माझं आणि तुझं ही माझं " अशी मानसिकता असणाऱ्या माणसाचा स्वभाव जन्मत: तर नक्कीच तसा नसतो! अशा व्यक्तीच्या या वृत्तीचा अभ्यास करताना त्याचे बालपण कोणत्या वातावरणात गेले? कुठल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमध्ये तो वाढला? त्याचेवर कुणा कुणाचे चांगले/वाईट संस्कार झाले? या सर्व बाबींचा व्यवस्थितपणे विचार करावा लागेल! कुठल्यातरी प्रकारची असुरक्षितता त्याला वाटत असावी व त्यातूनच अशी स्वार्थी वृत्ती माणसात तयार होत असावी.जी गोष्ट हवी असते ती योग्य त्या वयात व योग्य त्या प्रमाणात  न मिळाल्यामुळे संधी मिळताच  माणूस कुठल्याही थराला जाऊन अशा गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. अश्या प्रकारे मिळवलेली गोष्ट त्याच्याकडून कुणी हिसकावून तर घेणार नाही ना? अशी भीती त्याच्या मनात कायम घर करून रहाते,मग तो अशा गोष्टींचा साठा करायला लागत असावा.मग- माझे आहे ते माझेच आहे पण इत्तरांकडे आहे, तेही फक्त माझ्याकडेच असले पाहिजे! अशा मानसिकतेपोटी त्याच्यामधील स्वार्थी वृत्ती त्याच्या मनात जागी होत असावी व शेवटी तोच त्यांचा स्वभाव होत असावा! आपल्याकडे आजूबाजूचे लोक वेगळ्या नजरेने बघत आहेत याची अशा माणसांना जाणीवच होत नसावी!!!. .......प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment