आनंदी जीवन.
मुळात आनंद ही संकल्पना समजून घेण्यासाठी, आनंद म्हणजे नक्की काय? हे ठरवायला हवे.कुणाला कशात आनंद मिळेल हे सांगणे अवघड आहे.कुणाचा आनंद खुप सारा पैसा/दौलत कमावण्यात असेल तर कुणाचा आनंद एक कुटूंबवत्सल यशस्वी माणुस म्हणुन जगण्यात असेल.तर कोणी सत्ता, प्रतिष्ठा व प्रसिध्दी मिळवण्यात स्वत:ला आनंदी मानत असतील तर काही लोक स्व. आनंदी जीवनाची व्याख्या ही व्यक्तीसापेक्ष आहे! सर्वसाधारणपणे, मानवी मनाची प्रसन्न अवस्था म्हणजे आनंद! मानवी जीवनामधे प्रसन्नता कशामुळे येऊ शकते हे प्रथम पाहू-
१. मनासारखे घडणे- मनात जसा विचार केला होता तसेच घडले तर ती व्यक्ती स्वत:ला आनंदी समजते पण हा आनंद वरवरचा असू शकतो.स्वत:च्या मनासारखे घडले म्हणुन एकवेळ ती व्यक्ती आनंदात असेल पण त्याचे जीवन आनंदी आहे असे सरसकट ठरवणे चुकीचे आहे.व्यक्तीचे जीवन आनंदी आहे म्हणजे त्या व्यक्ती च्या कुटूंबातील / संपर्कातील सर्व व्यक्ती सुखी समाधानी असणे.
म्हणजेच जीवन आनंदी होण्यासाठी केवळ स्वत:पुरते बघता येणार नाही.आजुबाजूची परिस्थिती आनंदी जीवनासाठी योग्य असायला हवी.ही परिस्थिती योग्य असण्यासाठी एकुणच आबादी आबाद असणे आवश्यक आहे.जे केवळ अशक्य आहे.याचा अर्थ तुमचे जीवन आनंदी होणारच नाही असे नाही.
२.वास्तवाचा स्वीकार- आनंदी जीवनासाठी जे तुमच्या आजुबाजूला आहे त्या वास्तवाचा स्वीकार करायला हवा.सर्व गोष्टी मनासारखे घडणे तुमच्या हातात नाही हे सर्वप्रथम समजून घ्यायला हवे.जे आहे ते जसेच्या तसे स्वीकारून जे बदलणे तुमच्या हातात आहे ते बदलण्याचा प्रयत्न करणे यालाच तर जगणे म्हणतात! स्वत:चे जीवन आनंदी होण्यासाठी कुटुंब सुखी करावे लागेल.सर्व प्रकारच्या ऎहीक सुविधा प्राप्त करण्यासाठी योग्य ते प्रयत्न व कष्ट तुम्हालाच करावे लागणार! आनंद कशात आहे हे सुध्दा तुम्हीच ठरवणार! थोडक्यात काय तर जे आहे त्यामधेसुध्दा आनंदात असणे तुमच्या स्वत:च्या हातात आहे! आनंद कशात आहे, सुख कशात आहे, आपल्या मर्यादा काय आहेत, योग्य काय, अयोग्य काय यासंबधी चा संवाद स्वत:च्या अंतर्मनाशी करा आणि बघा मनातल्या प्रश्नांची उत्तरे भराभर मिळायला लागतील आणि ही उत्तरेच तुमच्या आनंदी जीवनाची किल्ली आहे.आनंदी होण्याचा मार्ग स्वत:लाच शोधावा लागणार आहे. आनंदी जीवनासाठी कोणत्याही अध्यात्मिक गुरुकडे जायला नको! त्यांच्याकडेही याचे तयार उत्तर मिळणार नाही.जरा शांतपणे बसा,वास्तवाचा स्वीकार करा, मध्यम मार्ग काढण्याचा विचार करा आणि कामाला लागा बघा आनंद अगदी जवळ आहे.

No comments:
Post a Comment