उत्तम आरोग्यासाठी जाणा आपली ताण तणावाची पातळी .
आजच्या धकाधकीच्या जीवनामधे माणसाला अनेक प्रकारच्या समस्याना तोंड द्यावे लागते .या धावपळीमधे कळत नकळत अनेक प्रकारचे ताण घेउन माणुस जगत असतो. या ताणामुळे वेगवेगळे मनोकायिक आजार (उदा.रक्तदाब,,मधुमेह ,इ.)होतात. मुळात तुम्हाला ताण आहे की नाही हे योग्य वेळी माहीत होणे गरजेचे आहे.एकदा तुम्हाला ताण आहे हे मान्य झाले की त्याचे नियोजन करणे व त्याद्वारे होणारे संभाव्य धोके टाळणे शक्य होइल.तुर्तास तुम्हाला ताण तणाव आहे की नाही हे खालील प्रश्नांची प्रामाणिक पणे उत्तरे दिली तर कळू शकेल.या प्रश्नांची उत्तरे देताना कधीच नाही साठी 1 गुण्, कधी कधी साठी 2 गुण् , ब-य्र्याचदासाठी 3 गुण् व नेहमीच साठी 4 गुण् असे गुण द्या.प्रश्नाची उत्तरे जास्तीत जास्त विचार् पुर्वक दिल्यासच योग्य मुल्यमापन होऊ शकेल.तेव्हा पहा आपण किती तणावग्रस्त आहात?
1.काही चुकिच्या गोष्टी घडल्या तर् मी स्वत:ला दोष देतो.
2.समस्या च्या अतिरेकामुळे एक दिवस स्फोट होउन अघटीत काही होइल् असे वाटते.
3.मी वयक्तिक समस्या विसरण्यासाठी स्वत:ला मुद्दाम कामामधे गुंतवून् घेतो.
4.मी माझा साठलेला राग व निराशा माझ्या जवळच्या व्यक्तीवर रागावून काढतो.
5.मी जेव्हा तणावग्रस्त् असतो तेव्हा माझ्या वागण्यात नकारात्मक बदल होतात.
6.मी माझ्या जीवनातील सकारात्मक बाबींपेक्षा नकारात्मक बाबीवर जास्त विचार करतो.
7.नविन परिस्थिती मधे मी स्वत:ला असुरक्षित समजतो.
8.मी सध्या करत असलेले काम कुचकामी आहे असे मला वाटते.
9.मी कामावर अथवा मिटींगला उशिरा पोहचतो.
10.माझ्यावर कुणी टिका केली तर मला ती फारच झोंबते.
11.मी दिवसभरात काहीच काम केले नाही तर मला अपराधी वाटते.
12.मला गरज असो वा नसो प्रत्येक कामाची घाई असते.
13.मला आवड असुनही दररोजचे वर्तमानपत्र वाचायलाही वेळ मिळत नाही.
14.मला कोणतीही सेवा ताबडतोब मिळावी असे वाटते.
15.मला माझ्या मनातील ख-या भावना कामावरील व्यक्ती अथवा कुटूंबियाकडे व्यक्त करणे जमत नाही.
16.मी माझ्या कुवतीपेक्षा जास्त जबाबदा-या अंगावर घेतो.
17.मी माझे व्यवसायबन्धू किंवा माझे वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन घेणे टाळतो.
18.मी माझ्या शारिरीक व व्यावसायिक मर्यादा लक्षात न घेता जबाबदा-या घेतो.
19.मी कामात एवढा व्यस्त असतो की मला मनोरंजन व माझ्या आवडत्या छन्दासाठी वेळ मिळत नाही.
20.मी सारासार विचार न करताच परिस्थिती ला सामोरा जातो.
21.माझ्या कामातील व्यस्ततेमुळे मी आठवडा आठवडा मित्राबरोबर बाहेर जेवायला जाऊ शकत नाही.
22.अवघड परिस्थिती ला तोंड देण्यापेक्षा ती टाळण्याकडे माझा कल असतो.
23.आजुबाजूचे लोक माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात असे वाटते.
24.माझ्यावर कितीही कामाचे ओझे असले तरी मी त्याबद्द्ल कुणाशीही स्पष्ट्पणे बोलत नाही.
25.मी माझ्याकडील कामे हाताखालील व्यक्तीना सोपवणे टाळतो.
26.मी कामांचा प्राधान्यक्रम विचारात न घेता कामे उरकण्याची घाई करतो.
27.मला कुणाच्याही विन्ंतीला किंवा मागणीला नाही म्हणणे जमत नाही.
28.मला दररोजचे काम त्याच दिवशी पुर्ण व्हावे असे वाटते.
29.माझ्यावर सोपवलेले काम मी कधीच पुर्ण करू शकणार नाही असे मला वाटते.
30.अपयशाच्या भितीमुळे मी कामाला सुरूवातच करणे टाळतो.
31.माझ्या कामापुढे माझे कुटूंब व खाजगी आयुष्य मी दुय्यम समजतो.
32.मनाप्रमाणे घडत नाही म्हणून मी फारच उदास व अस्वस्थ असतो.
वरील मुल्यांकनामधे जर आपले गुण 32 ते 64 दरम्यान असतील तर असे समजा की तुम्ही तुमच्या ताणतणावाची पातळी योग्य प्रमाणात राखली आहे.जर तुमचे गुण 65 ते 95 मधे असतील तर तुम्ही त्या मानाने सुरक्षित ट्प्प्यात आहात पण काळजी घ्यायला हवी. जर का आपले गुण 96 ते 128 दरम्यान असतील तर धोक्याचा इशारा समजा व ताण तणाव मुक्तीसाठी योग्य ते उपचार सुरू करणे आवश्यक आहेत असे समजा.लक्षात घ्या-
आपणच आपल् जगण अवघड करत असतो,पालथ्या घड्यात पाणी विनाकारण् भरत असतो.
तो तसा ती तशी उगीचच बडबडत असतो,साप साप म्हणुन ब-याचदा भुईला बडवत असतो.
भिती चिंता कटकट वटवट, करीत असतो जीवनाची फरफट. विनाकारण चडफडत असतो.
आपणच आपल् जगण अवघड करत असतो.
तेव्हा चला - तणावमुक्त जगु ! आरोग्यपुर्ण जगू !
----प्रल्हाद को. दुधाळ.
रूणवाल पार्क पुणे 37. मो.9423012020. आधार-Reducing Stress by Tim Hindle.
शारीरिक तन तणाव कमी व्हावा यासाठी आम्ही संपूर्णतः नैसर्गिक Food Supplement घेऊन आलो आहोत.
ReplyDeleteभेटा - http://www.vgmpl.com/