परिचय
अनोळखी लोकांसमोर गेलं, की त्यांना आपण कोण आहोत हे सांगण्याची प्रक्रिया म्हणजे परिचय असे ढोबळ्मानाने म्हणता येईल.
एखाद्याचा परिचय करून द्यायचा म्हणजे काय काय माहिती दिली जाते?
परिचयात सर्वप्रथम सांगितले जाते नाव, गाव, तो करत असलेला व्यवसाय, त्यातले त्याचे पद इत्यादी इत्यादी.
मी एका अज्ञात्मिक शिबिराला गेलो होतो. तिथे एक प्रश्न विचारला गेला...
तुम्ही कोण आहात?
तुमचा परिचय द्या...
मी माझं नाव सांगितलं.
अजून...?
मी माझं आडनाव सांगितलं.
अजून...?
मी माझ्या वडिलांचा मुलगा, आजोबाचा नातू, पंजोबाचा पणतू, माझ्या मुलाचा बाप, नातवाचा आजोबा, पणतूचा पणजोबा इतपर्यंत पोहोचलो.
बस एवढाच परिचय? अजून?
मग मी माझं पद, गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देशही सांगितला!
अजून...?
मी विचारात पडलो, खरंच काय आहे माझा परिचय?
या जगातल्या हजारो माणसांसारखा एक माणूस,
असंख्य पशू, पक्षी, जीव, जंतू यांसारखाच एक सजीव!
मनुष्यप्राणी?
हो,यत्किंचित प्राणीच!
बस्स, तुझी एवढीच ओळख आहे...
एक... मनुष्यप्राणी!
हाच आहे तुझा खरा परिचय!
..... प्रल्हाद दुधाळ.

No comments:
Post a Comment