द्वेष...
आज एक काम करा. डोळे मिटून जरा विचार करा आपण सध्या कुणा कुणाचा द्वेष करतो?
कारण काहीही असो, आपण ज्या ज्या व्यक्तींचा द्वेष करतो अशांची नावे डोळ्यासमोर आणा.ही यादी कदाचित खूप मोठी असेल! असे असेल तर सरळ कागद पेन घ्या आणि त्यांची नावे लिहून काढा.
तुम्ही माना अथवा मानू नका; पण हे सत्य आहे की तुम्ही द्वेष करत असलेल्या व्यक्तींची ही यादी जेव्हढी मोठी तेव्हढी तुमची मानसिक अस्वस्थता जास्त आहे!
जरा प्रामाणिकपणे आपली मनातली ही अशांतता आणि त्यापोटी होणारे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होणारे दुष्परिणाम मग ते मानसिक असतील वा त्यापुढच्या टप्प्यावर म्हणजे कोणत्या तरी शारीरिक आजाराच्या स्वरूपात असतील, त्याची पडताळणी करून घ्या. या सगळ्या अशांतीचे मूळ कदाचित तुम्ही लोकांच्या करत असलेल्या द्वेषभावनेत असू शकेल. तुम्ही केलेल्या यादीतले एक एक नाव बंद डोळ्यसमोर आणा आणि स्वतःची माफी मागा. इथे तुम्हाला त्या व्यक्तीच्या समोर जाऊन माफी मागायची नाही तर त्या व्यक्तीच्या द्वेषभावनेचे ओझे मनावर बाळगल्याबद्दल स्वतःची माफी मागायची आहे. तुम्ही जेव्हा असे प्रत्येकाला तुमच्या द्वेषभावनेतून मुक्त कराल तेव्हा बघा तुम्हाला किती हलकं हलकं वाटायला लागेल. ते हलकेपण जाणीवपूर्वक सांभाळा.
तुम्ही द्वेष केल्याने समोरच्या व्यक्तीला काही फरक पडत नाही तर तुमच्या स्वतःच्या जीवनावर मात्र दूरगामी परिणाम होतो. म्हणून या द्वेष भावनेचा त्याग करा आणि जीवनातला आनंद साजरा करा...
पटलं तर जरूर अमलात आणून बघा!
© प्रल्हाद दुधाळ.

No comments:
Post a Comment