थोरली विहीर...एक गुढ!
मुख्य रस्त्यावरून आमच्या वाडीत जायला अत्यंत अरूंद असा रस्ता आहे. या रस्त्याने आत वळले की एका छोट्या पुलावर आपण अलगद उतरतो.तिथे पुल आणि ओढ्याच्या सांध्याला गावाच्या पाणी पुरवठ्यासाठीची विहीर दिसते. उंच कठडा असलेली ही विहीर अगदी अलिकडे म्हणजे वीसेक वर्षापुर्वी खोदली गेली आहे. अरूंद रस्त्याने आपण अजून थोडे पुढे गेलो की रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन विहीरी दिसतात त्यातल्या एका विहीरीला तर कठडाही नाही आणि मी लहानपणापासून बघतोय की ती वापरातही नाही. दुसऱ्या बाजूची विहीर म्हणजे पदुबाईची विहीर. या विहीरीच्या बाजूला अगदी छोटेसे पदुबाईचे मंदीर आहे म्हणून ती पदुबाईची विहीर!या विहीरीवर माझ्या लहानपणी मोट चालायची. मोट चालू असताना चाकाचा येणारा कुई कुई आवाज आणि खड्या आवाजातली मोटेवरची गाणी अजूनही कानात घुमतात.आधी डिझेल पंप आणि नंतर गावाला वीज आल्यावर विजेचे पंप आले आणि या मोटेवरच्या गाण्यांचा व चाकांच्या आवाजाला गाव विसरून गेलं. या दोन विहीरीच्या मधे जेमतेम आठ दहा फुटाचे अंतर आहे त्यातली एक ओसाड व आत झाडे वाढलेली विहीर पाहून गावाला पहिल्यांदा आलेला पाहूणा घाबरतोच इथल्या लोकांना मात्र या धोकादायक रस्त्याची सवय झालेली आहे!
या विहीरींपासून ओबडधोबड रस्त्याने आपण थोड्या चढण असलेल्या रस्त्याने पुढे निघतो आणि अचानक समोर आलेल्या थोरल्या विहीरीकडे बघून दचकतो! एका बाजूला रस्त्याच्या पातळीवर असलेली ही थोरली विहीर आणि दुसऱ्या बाजूला जुन्या पडलेल्या घराची भिंत या दोन्हीच्या मधून जेमतेम एक गाडी जाईल एवढा निमुळता खडबडीत रस्ता, नवख्या ड्रायव्हरला हमखास वाटते अरे आपली गाडी चुकून या विहीरीत तर कलंडणार नाही ना?
गेले कित्येक वर्षे हा रस्ता तसाच आहे आणि ही थोरली विहीरही तशीच आहे!
ही जुनी विहीर गेल्या कदाचित ऐंशी ते शंभर वर्षापासून वापरात नसावी. ही विहीर सार्वजनिक आहे.भल्या मोठ्ठ्या दगडात अगदी तळापर्यंत बांधकाम असलेली ही विहीर आता जरी पडीक असली तरी कदाचित एके काळी आजूबाजूच्या कित्येक शेतांसाठी जीवनदायिनी असेल. इथेही आठ दहा मोटा एकावेळी चालत असतील. या विहीरीला थोरली विहीर का म्हणतात हे खात्रीने सांगू शकणारे सध्या कुणी हयात नाही पण कदाचित सर्वात जुनी एकमेव विहीर म्हणून हीला थोरली विहीर म्हणत असतील. नंतर खोदली म्हणून कोणत्या विहीरीला धाकटी विहीर असे नाव असल्याचे मात्र ऐकिवात नाही,असो.कदाचित सर्वात थोरल्या घराण्याची म्हणूनही ही थोरली असेल!
या विहीरीबद्दल एक आख्यायिका आहे. इंग्रज सरकारला हवा असलेला एक क्रांतिकारी इथल्या शेतात कित्येक दिवस लपून बसला होता. या गावच्या लोकांनीच त्याला आसरा दिलेला होता. इथले लोक त्या पापा नावाच्या फरारी म्हणून घोषित असलेल्या क्रांतिकारकाराला खाणेपिणे पुरवायचे. तर कित्येक दिवस हा पापा इथल्या शेतात लपून बसला होता म्हणे. एक दिवस मात्र कुणीतरी फंदफितुरी केली आणि पापा पोलिसांच्या हाताला लागला. पोलिसांनी पापाला हाताला काढण्या बांधून शेतातून बाहेर आणला.अरूंद पायवाटेने पोलीस त्याला घेवून चालले होते. या विहिरीच्या काठवरून जात असताना प्रचंड शक्तीमान असलेल्या पापाने त्याला बांधलेल्या काढणीला हिसका दिला आणि विहीरीत स्वतःला झोकून दिले! काढणीचे दुसरे टोक पोलीसाने स्वत:च्या हाताला बांधले होते त्यामुळे पापाबरोबर तो पोलीसही विहीरीत पडला. त्या काळी विहीरीला खूप पाणी होते. पापा त्या पाण्यात बुडून मेला मात्र अर्धमेल्या पोलीसाला इत्तरानी वाचवले! कुणी म्हणतात की हा पापा पत्रिसरकारशी संबंधीत होता, पण खात्रीशीर माहिती कुणाकडेच नाही!
ही थोरली विहीर मात्र आता कचराकुंडी झाली आहे. कुणी जाणीवपूर्वक तिला बुजविण्याची शक्यता नाही कारण त्यासाठी बऱ्यापैकी खर्च करावा लागेल पण आपल्या पोटात कचरा साठवत साठवत ही एक गुढ असलेली थोरली विहीर काही वर्षानंतर इतिहासजमा होईल हे मात्र नक्की!( ऐकिव माहीतीवर आधारीत)
...... प्रल्हाद दुधाळ.

No comments:
Post a Comment