रसग्रहण -.
येरे येरे पावसा.
पारंपारिक पाऊस गाणे- माझ्या नजरेतून....
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा!
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून!
कधी लिहिले?, कुणी लिहिले? माहीत नाही; पण “येरे येरे पावसा” हे गाणे लहानपणी ऐकले नाही, वा हे गाणे गात पावसात स्वत:भोवती गिरक्या घेतल्या नाही असा मराठी माणूस सापडणे अवघड आहे.महाराष्ट्रातील कित्येक पिढ्या पहिल्या पावसात हे पाऊसगाणे म्हणत, पावसात भिजत, गारा वेचत मोठया झाल्या असतील.
अत्यंत साध्या सोप्या भाषेत हे गाणे रचले आहे.
'आपले काम साधण्यासाठी ज्याच्याकडे आपले काम आहे अशा माणसाला कशाची तरी लालूच दाखवली की तो माणूस समोरच्या व्यक्तीचे हवे ते ऐकतो आणि मिळणाऱ्या फायद्यासाठी ते काम करून देतो!’- हा बहूसंख्य माणसातला गुण म्हणा किंवा अवगुण म्हणा पावसालाही लागू होईल आणि पैशाची लालूच दाखवून त्याला पडायला भाग पडेल.असा विचार अतिबुध्दीमान आणि अतिशय व्यवहारी माणसाशिवाय कोण करणार?. या मिळालेल्या लाचेला जागून मुसळधार पाऊस तर येतो; पण माणसाने दिलेला पैसा मात्र खोटा झालेला! माणसात असलेल्या उपजत खोटेपणाची जणू काही येथे कबुलीच दिली आहे!
पण पावसानेही माणसासारखेच वागायचे ठरवल्यावर काय होणार? पावसाच्या सरीमागून सरी कोसळल्या.माणसाच्या इच्छेप्रमाणे मडकेही भरायला घेतले पण तो एवढा जोरात कोसळला की मडकेच वाहून गेले!
साध्या सोप्या भाषेतल्या या बालागीतात माणसांच्या कृतघ्नपणावर घाव घालायचे काम या अज्ञात कवीने केले आहे हे मात्र नक्की!
......... प्रल्हाद दुधाळ.

No comments:
Post a Comment