मनोरंजन.. चला बालपण जगू या!- निबंध
दुसरी किंवा तिसरीत शिकतोय असे समजून लिहिलेला निबंध .
माझा आवडता प्राणी .
मी छोटा होतो ना,तेव्हा मला कोणताच प्राणी आवडायचा नाही.एकदा मी घरात खेळत होतो, आईने मला प्यायला दुध ठेवलं होत.माहीत नाही, कुठून एक बोका घरात आला आणि सगळ दुध पिवून टाकल.मी रडायला लागलो तर त्याने माझ्या हाताला बोचकारले की! आईचा आवाज ऐकून बोक्यान धूम ठोकली.त्यामुळे मला सगळ्या प्राण्यांची भीतीच वाटायची!
एकदा मात्र मजा झाली.मी चालत चालत शाळेत चाललो होतो.डब्यात आईने शिरा करून दिला होता.रस्त्यात एक बसचा थांबा होता.तिथून मी चाललो होतो, तर काय झालं ना ,एक कुत्र्याचं पिल्लू माझ्या मागे मागे यायला लागलं.मी घाबरून पळायला लागलो तर ते सुध्दा माझ्यामागे पळायला लागलं.मी थांबलो.पिल्लू माझ्या पायाजवळ आलं.मी नीट बघितलं तर एकदम मस्त दिसत होत ते! मी हळूच त्याला हात लावून बघितला.ते माझ्याशी मस्तीच करायला लागलं की! मला ते पिल्लू खूप आवडलं.मी डब्यातला अर्धा शिरा त्याला खायला दिला.त्याने पटापट खावून घेतला मग मी राहिलेला शिराही त्याला देवून टाकला! आता शाळेला उशीर होईल म्हणून मी पुढे गेलो तर ते पिल्लू माझ्यामाग आलं.मी त्याला सांगितलं-“मी शाळेत चाललोय,तू थांब इथं!”
ते खरंच थांबल की! संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी निघालो तर ते रस्त्यात माझी वाट बघत उभं होते.माझ्या मागे मागे बस थांब्यावर आल्यावर ते मागच्या बाजूला गेले.दुसऱ्या दिवशी शाळेत निघालो तर ते माझी वाट बघत होत.परत शाळेपर्यंत आलं.बाहेरच थांबलं.आणि मग असं दररोज व्हायला लागलं.मी डब्यातलं अर्ध जेवण दररोज त्याला देतो.त्याच्याबरोबर खेळतो.
मी आता त्याला रॉकी म्हणतो.रॉकी खूप हुशार आहे.माझ एका मित्राशी एकदा भांडण झालं तर रॉकी त्या मित्रावर जोरात भुंकला, तो घाबरला आणि पळून गेला.मी आता दररोज त्याच्याशी गप्पा मारतो.फार मस्तीखोर आहे रॉकी.मी अजून माझ्या आईला रॉकीबद्दल सांगितले नाही.आईचा ओरडा पडेल ना म्हणून नाही सांगणार आईला! रॉकी माझ्याबरोबर असला ना की मला एकदम मस्त वाटत.माझे शाळेतले मित्र म्हणतात-“ लै भारी आहे रे तुझे कुत्रे!”
रॉकीला कुणी कुत्रे म्हणलेलं मला आवडत नाही.माझा दोस्त आहे तो! मला दररोज शाळेत पोहोचवतो,परत घ्यायला येतो! मला रॉकी फार आवडतो.मी आता आईला सांगणार आहे वाढदिवसाला मला काहीच गिफ्ट नको फक्त रॉकीला घरी आणू दे!
.... प्रल्हाद दुधाळ.

No comments:
Post a Comment