दिल को देखो ......
कॉलेजात पहिल्या वर्षात शिकत होतो.आर्थिकदृष्ट्या होस्टेलमधे रहाणे अथवा जेवनासाठी मेस लावणे मुळीच परवडणारे नव्हते.येरवडा भागात एका झोपडपट्टीत रहात होतो. त्या वस्तीत रहात असताना तेथे अनेक मित्र कायमचे जोडले गेले. तेथेच माझी आणि सुरेशची ओळख झाली,पुढे त्याच्याशी घनिष्ट मैत्री झाल्री .दिसायला एकदम गोरागोमटा, साडेपाच फूट उंची शिवाय आकर्षक बोलणे यामुळे त्याची समोरच्या व्यक्तीवर प्रथमदर्शनीच छाप पडायची! त्या भागातल्या नगरसेवकाची व याची चांगली ओळख होती त्यामुळे त्याचा सामाजिक व राजकिय क्षेत्रातही राबता असायचा. आम्ही दोघे कॉलेजचा वेळ सोडून कायम बरोबरच असायचो.आमची मैत्री पुढे एवढी वाढली की आयुष्यातल्या अगदी खाजगी गोष्टीही तो माझ्याशी शेअर करू लागला. माझ्यापेक्षा एखाद्या वर्षाने लहान असलेला सुरेश आय टी आय मधे कंपोझरचा कोर्स करत होता. तेथेच सुरेशला माया भेटली. सुरूवातीला गृपमधे डब्यातली भाजी शेअर करता करता या दोघांची चांगलीच गट्टी जमली. तिची डायरी एकदा सुरेशने मला दाखवायला आणली होती. सुरेशने वर्णन केले होते त्यापेक्षा तिचे अक्षर कित्येक पटीने सुंदर होते. त्या डायरीत तिने लिहिलेल्या सुंदर कविता होत्या, मराठी व हिंदी शेरोशायरी होती, अनेक सुंदर स्केचेस होती. त्या डायरीत मी अक्षरश: हरवून गेलो होतो. सुरेशला एक संवेदनशील मैत्रीण लाभली होती. फावल्या वेळेत ते दोघे कुठे कुठे फिरत होते. सुरेशकडून मला त्यांच्या भटकंतीची बितंबातमी दररोज कळत होती.
- आज आम्ही चित्रकलेचे प्रदर्शन पाहिले.
- आज पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो.
- आज पांचाळेश्वर लेणी पाहीली
- पर्वतीवर गेलो होतो.
- सारसबागेत,बंडगार्डनमधे गेलो इत्यादी इत्यादी.
नंतर नंतर त्यांची रविवार व सुट्टीच्या दिवशीही भटकंती सुरू झाली दुसऱ्या दिवशी विचारले की वृतांत मिळायचा. पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या सर्व गड किल्ल्यांवर, कार्ले भाजे लेणी, मंदिरे पाहून झाली होती . तिने लिहिलेली नवीन कविता लगेच सुरेश आणून मला वाचायला द्यायचा. तिचे उच्च विचार. तिचे सर्व क्षेत्रातले ज्ञान. जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोण, मुख्य म्हणजे कलासक्त वृत्ती यावर सुरेश भरभरून बोलायचा. एवढी चांगली मैत्रीण त्याला लाभली याचा मला हेवाही वाटायचा. आय टी आय चा दोन वर्षाचा कोर्स झाल्यावर सुरेश व ती दोघानीही एन सी टी व्ही टी या कोर्स ला ॲडमिशन घेतले. सुरेश आणि माया आता एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते. सुरेश रविवारीही घरी थांबत नाही हे पाहून त्याच्या आईने मला त्याबद्दल विचारले पण त्याच्या कोर्स व त्याचे क्लास असे काहीबाही सांगून मी वेळ निभावून नेली.
दरम्यानच्या काळात मी दुसरीकडे रहायला गेलो आणि सुरेशबरोबरच्या दररोज होणाऱ्या भेटी बंद झाल्या. कधीतरी तो मला माझ्या ऑफिसात भेटायला यायचा.माया व तो याशिवाय त्याच्या बोलण्यत दुसरा विषयच नसायचा . मी त्याची प्रेमकहाणी ऐकत रहायचो.
एक दिवस मधल्या सुट्टीत आचार्य अत्रे सभागृहात ग्रंथ प्रदर्शनातील पुस्तके चाळत होतोमाझ्या ऑफिसच्या अगदी शेजारीच हे सभागृह असल्यामुळे ग्रंथप्रदर्शन भरले की दररोज मी मधल्या सुट्टीत तेथे जायचो. तर, त्या दिवशी अशीच पुस्तके चाळत असताना सुरेश मला दिसला. त्याच्या बरोबर एक मुलगी होती. सावळा म्हणता येणार नाही असा काळा रंग, जेमतेम पाचेक फूट उंची, तिचे डोळे मात्र बोलके होते. सुरेशच्या आकर्षक व्यक्तींत्वापुढे तीचे कुरूपपण अजुनच अधोरेखीत होत होते. आजुबाजूचे लोकही तिरक्या नजरेने या विजोड जोडीकडे बघत होते! मी सुरेशच्या समोर गेलो. त्याने मायाची ओळख करून दिली.
" सुरेशच्या तोंडी तुमचे नाव ऐकलय खूप वेळा!"
तिचा आवाज एकदम सुंदर होता! अगदी रेडिओवरील अनाउंसर बोलल्याचा भास झाला.
समोरच्या हॉटेलमध्ये त्या दोघाना चहाला घेवून गेलो. मायाची एक प्रतिमा माझ्या मनात तयार झालेली होती त्या प्रतिमेला प्रत्यक्ष मायाच्या दर्शनाने छेद गेला होता!त्या दोघांना मात्र माझ्या मनात चाललेल्या विचारांची खबरबात असायचे कारण नव्हते!
सुरेश आणि माया आपल्या भावविश्वात दंग होते. थोडावेळ गप्पा मारून ते दोघे निघून गेले. माझ्या मनातले विचारचक्र मात्र थांबले नव्हते. या दोघांची ही प्रेमकहाणी सफल संपूर्ण होईल? माया मनाने अत्यंत सुंदर होती,सर्वगुणसंपन्न होती,पण फक्त मनाच्या सौंदर्यावरच यांचे प्रेम यशस्वी होईल का हा नव्याने समोर आलेला गुंता मला चांगलाच छळू लागला. बाजूला कुठेतरी गाणे लागले होते....
" दिलको देखो, चेहरा ना देखो, चेहरा ना देखो, चेहरे ने लाखोंको लूटा,
दिल सच्चा और चेहरा झुटा, दिल सच्चा और चेहरा झुटा!"
मी मनोमन देवाजवळ प्रार्थना केली ....
" देवा यांचे प्रेम असेच बहरत राहू दे, जालिम जमान्याची त्याला नजर लागू देवू नको!"
....... प्रल्हाद दुधाळ .

No comments:
Post a Comment