मला पुण्याच्या पी एम पी एल मधून फार क्वचित प्रवास करावा लागतो. काल तब्बेत बिघडल्यामुळे ऑफिसातुन लवकर निघालो. बस ने घरी जावे म्हणून बसस्टॉप ला आलो. माझे ऑफिस तसे ऑड ठिकाणी असल्याने तीन बसेस बदलून घरी जावे लागणार होते. साधारण दहा मिनिटात पुणे मनपा ची बस मिळाली. आत गेल्या गेल्या वाहक महाशयांनी आदेश दिला "सुट्टे पैसे काढा." मी खिशात चाचपले सुट्टे पैसे नव्हते. मी पन्नासची नोट दिली.
" सुट्टे द्या हो पाच रूपये!" तो खेकसला.
" पाच नाहीत "
माझ्याकडेही नाहीत!" पंचवीस रुपयाचे तिकिट व वीस रूपये त्याने माझ्या हातात कोंबले.पुढे गेला .
मला पुढच्या स्टॉपला बसायला जागा मिळाली. मी बसल्या बसल्या वाहकाकडे बघत होतो. तो प्रत्येकाला सुट्ट्या पैशासाठी ओरडत होता. अनेक पॅसेंजर त्याला सुट्टे पैसे देत होते तो अशी आलेली चिल्लर पॅंटच्या मागच्या खिशात टाकत होता. अशा प्रकारे त्याने निदान सतरा अठरा लोकांचे पाच पाच रूपये मागे ठेवले होते. कुणी जर पैसे मागितले की तो म्हणायचा " द्या सुट्टे पाच,आणि दहाची नोट घ्या!"
पाच रूपयांसाठी कशाला वाद म्हणून बरेच पॅसेंजर आपला स्टॉप आला की उतरून जात होते.
मी विचार करत होतो. पाच पाच रूपयांप्रमाणे दिवसभरामधे हा वाहक बरेच पैसे कमावत असेल, नाही का ? लोकानी तिकिटाचे नेमके पैसे दिले तर असा प्रश्नच उद्भवला नसता, पण हल्ली ए टी एम मुळे चिल्लर फारशी दिसतच नाही.माझा स्टॉप जवळ आला तसे मी वाहकाला पाच रूपये परत देण्याबद्द्ल खुणावले. त्याने खुणेनेच तुम्हीच पाच द्या, मी दहा देतो खुणावले. मी उठून त्याच्या जवळ गेलो.
" अहो नाहीत पाच रूपये !" आता तो तोंडाने बोलला.
" बघा आले असतील की !" मी.
" अहो असते तर, कशाला ठेवले असते!"
" बर पाच रूपये तुमच्याकडे नाहीत ना, मग मला पाच रूपयाचे एक तिकिट द्या बर!" मी शांतपणे त्याला मार्ग सांगितला.
" काय , पाच रूपयाचे तिकिट देवू ?"
" हो , द्या पाच रूपयाचे तिकिट, तेव्हढीच पी एम पी एल ला देणगी !"
' काय वेडा माणूस आहे ' अशा नजरेने त्याने माझ्याकडे पाहीले मशीनमधून पाच रूपयाचे तिकिट काढून माझ्या हातात दिले. आजूबाजूचे पॅसेंजर ' काय जिरवली ' असा भाव चेहऱ्यावर ठेवत हसत होते !
..... प्रल्हाद दुधाळ.