लकडी पुलावरून आता दुचाकीला परवानगी दिल्याचे वाचले आणि माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा आठवला. ते 1992-93 साल असावं. मी माझ्या आयुष्यातली पहिली स्कुटर-बजाज कब खरेदी केली. मी तोपर्यंत स्कुटर चालवायला शिकलो नव्हतो. तर झाले काय की पहिल्याच दिवशी थोडी प्रॅक्टीस केली आणि सौ.ला मागे बसवून कार्पोरेशन मार्गे जंगली महाराज रोडने पुन्हा स्वारगेटकडे निघालो. डेक्कनवरून दुचाकीला बंदी असलेल्या लकडी पुलावरून स्कुटर चालवत अलका चौकाकडे निघालो आणि नेमकं व्हायचं तेच झालं....
पूल ओलांडल्याबरोबर डाव्या बाजूला चौकीच्या समोरच सहा ट्रॅफिक पोलीस उभे! एकाने अडवलं आणि माझ्या स्कुटरची चावी ताब्यात घेतली. गाडी बाजूला घेऊन, सौ.ला तिथंच उभं करुन मी प्रश्नार्थक चेहरा घेऊन त्या पोलिसांकडे गेलो....
" साहेब काय झालं?"
त्या पोलिसाने मला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं...
"स्कुटर नवीन का? "
" हो साहेब..."
" लायसन बघू... "
मी माझं लायसन्स त्याच्या हातात दिलं त्यानं ते शांतपणे त्याच्या वरच्या खिशात टाकलं ! आता बाकीचे पाचही जण माझ्याजवळ आले.
"पुण्यात कधीपासून राहाता? " एकाने मला तिरकस प्रश्न विचारला....
" पंधरा वर्षें... "
मी खरं ते सांगितलं..
" या पुलावर स्कुटरला बंदी आहे माहीत नाही का?"
आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला! खरं तर माझं शिक्षण आबासाहेब गरवारे कॉलेजात झालेलं आणि लकडी पुलावर दुचाकीला बंदी आहे हेही मला माहीत होतं, पण नवीन स्कुटरवर फेरफटका मारायच्या नादात मी ते साफ विसरून गेलो होतो!
"नाही हो, मला माहीत नव्हतं!आज तर स्कुटर घेतलीय मला कसं काय माहीत असणार? "
मी माझ्या चुकीचं समर्थन करू पहात होतो....
"चला, दोनशेची पावती फाडा...."
"जाऊ द्या ना माहीत नव्हतं म्हणून चूक झाली..."
मी विनवणीचा सूर आळवला...
"ते काही नाही पावती फाडावी लागेल...."
दुसऱ्या पोलिसाने आता घटनेचा ताबा घेतला होता....
काही तरी तोडगा निघून चहापाण्याची तरी सोय करायचा इरादा सहाही चेहऱ्यावर मी वाचला....
मी पवित्रा बदलायचं ठरवलं...
" एक काम करा, माझ्यावर रीतसर खटला दाखल करा,मला ही केस लढवायची आहे! तुम्ही सहाजण इथे आडबाजूला उभे राहून सावज पकडताय काय? मी वकील देऊन केस लढवणार! तुम्हाला खरंच सेवा करायची असती तर एकजण पुलाच्या त्या टोकाला उभा राहिला असता, मला तिथेच सांगितल असतं की हा पूल दुचाकीला बंद आहे तर मी पुलावर आलोच नसतो, पण तुम्ही सहा सहा जण बकरे पकडायला दबा धरून बसलात! तुम्हाला कुठे सही पाहिजे असेल ती घ्या...
आता तुम्ही खटला भरा माझ्यावर!
तसें माझे पन्नास हजार गेले तरी चालतील,पण मी आता दोनशे भरणार नाही!"
माझा तो पवित्रा त्यांना बहुतेक अनपेक्षित होता!
" अरे काय लावलाय खटला भरा, खटला भरा म्हणून..."
मी पुन्हा पुन्हा त्यांना खटला भरण्याबद्दल सांगत राहिलो...
शेवटी पहिला पोलीस माझ्याकडे आला....
" फार शहाणे आहात!पक्के पुणेकर दिसताय! पुन्हा चूक करू नका, हे घ्या.... "
वैतागून त्याने माझे लायसन्स आणि स्कुटरची चावी माझ्या हातात कोंबली....
मी स्कुटरला किक मारली, सौ.मागे बसली, कुत्सितपणे मी एकदा सहाही जणांकडे पाहिले आणि गियर टाकून स्पीड घेतला....
..... प्रल्हाद दुधाळ.(17/10/2019

No comments:
Post a Comment