उपवास आणि चिडचिड ....
काल उपवास आणि चिडचिडचि यासंबंधी पोस्ट वाचली आणि माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा आठवला....
त्यावेळी(१९९३) मी फोन इन्स्पेक्टर म्हणून पुण्याच्या कैंप भागातल्या एका विभागाचा इंचार्ज होतो.त्या काळी टेलिफोन म्हणजे सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेली गोष्ट होती .मोबाईल सेवा भारतात आस्तित्वातच नव्हती....
तर, माझ्या विभागातल्या टेलिफोन कनेक्शनबद्दलच्या तक्रारी, नवीन कनेक्शन देणे याची जबाबदारी माझ्यावर होती.माझ्या परीने ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा माझा प्रयत्न असायचा.येणाऱ्या ग्राहकांशी माझे वागणे, बोलणे तसेच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करायचो.त्यामुळे ग्राहक तसेच माझ्या हाताखाली काम करणारे कर्मचारी यांच्यात मी खूप पॉप्युलर होतो. कर्तव्यपूर्तीमधले एक वेगळेच समाधान मला त्या काळात मिळत होते....
अचानक काय झाले माहीत नाही; पण एका गुरूवारी सकाळी सकाळी एक ग्राहक माझ्याकडे आला . रागाने माझ्याशी त्याच्या टेलिफोन बाबत तो तक्रार करत भांडायला लागला आणि मी प्रथमच माझा एरवीचा शांत अवतार सोडून त्याच्या पेक्षा दुप्पट आवाज वाढवून त्याच्याशी वाद घालायला लागलो!
त्या दिवशी माझ्या स्टाफ बरोबरही मी चिडून बोलत होतो!
दुसऱ्या दिवशी मात्र मी नेहमी सारखा वागत बोलत होतो.
पुन्हा पुढच्या गुरुवारी अगदी तसेच घडले! त्या दिवशीही मी सगळ्यांवर चिडचिड करत होतो. संध्याकाळी माझे कधी नव्हे ते डोके दुखत होते.
नंतरचे सहा दिवस मात्र मी नॉर्मल होतो.असे काय होतेय ते माझे मलाच कळेना. मग दर आठवड्याला असेच घडत राहिले...
एक दिवस मी गंभीरपणे माझ्या स्वभावात होत असलेल्या त्या एका दिवसाच्या बदलाबद्दल विचार करत बसलो होतो, कारण माझ्या तशा वागण्याचा फटका काही ग्राहक व स्टाफला बसला होता.त्यांची नाराजी मला नंतर चांगलीच जाणवायला लागली होती. विचार करता करता अचानक माझी ट्यूब पेटली ....
दर गुरूवारी मी कुणीतरी सांगितले म्हणून उपवास धरायला लागलो होतो आणि नेमक्या त्या गुरूवारी माझी पहिल्यांदा चिडचिड झाली होती!!!
आपली चिडचिड पोटात काही नसल्याने होते आहे आणि दर गुरूवारी वादविवाद व भांडणे सुरु झाली हे लक्षात आल्यावर मात्र मी उपवासाच्या बाबतीत कानाला खडा लावला ते आजपर्यंत!
आता चिडचिड व्हायला लागली की मी मला भूक तर लागली नाही ना? हे तपासून पोटपूजा करून घेतो....
..... प्रल्हाद दुधाळ.

No comments:
Post a Comment