सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
माणसाने आपल्या भोवती वेगवेगळ्या नको त्या गोष्टींची कुंपने घालून घेतलेली असतात.या कुंपणाच्या आतले जग हेच खरे जग आहे असे तो समजायला लागतो.अशा कुंपणा पलीकडे असलेल्या भव्य जगाची त्याला जाणीवच उरत नाही.मग त्याच्या त्या संकुचित जगातल्या जाती, धर्म, आपला, तुपला अशा भेदाभेदात तो अडकून पडतो.त्याने आपल्याभोवती तयार केलेल्या कोषात तो इतका गुरफटून जातो की तो त्याचे खरे जगणेच विसरून जातो. ही एक प्रकारची गुलामगिरी त्याने स्वीकारलेली असते.या संकुचित जगात वावरताना तो मुक्तपणे विहरणे विसरून जातो आणि मग त्याची खरी ओळख हळू हळू पुसली जाते.
आजच्या या विजयादशमीच्या निमित्ताने स्वतः ला ओळखण्यासाठी या संकुचित सीमांचे उल्लंघन करून बाहेर काय चालले आहे ते उघड्या डोळ्यांनी बघायला हवे.या काल्पनिक भिंती पलीकडे मुक्त विचार, मुक्त जग आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत.तेव्हा आता चला; जात, पात, धर्म अशा सीमा ओलांडून त्या मोठ्या जगाकडे पाहू या! त्या वेगळ्या जगात आपली नवी ओळख निर्माण करुया. सीमोल्लंघन करूया संकुचित विचारांचे, सीमोल्लंघन करूया अहंकाराचे, सीमोल्लंघन करूया भेदभावाचे!
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे!
या नव्या सीमा ओलांडून सुख, शांती, आरोग्य आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या समृद्ध आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
हॅप्पी दशहरा!

No comments:
Post a Comment