जाणते अजाणतेपणी आपण भूतकाळात
कुणा कुणाला त्यांच्या संकटसमयी कोणत्यातरी
स्वरूपातील मदत केलेली असते तुम्ही ही गोष्ट कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली असते.पण
जेंव्हा तुमच्यावर तसाच प्रसंग येतो तेंव्हा उगाचच दुसरेही / निदान ज्यांना तुम्ही
मदत केली होती त्या व्यक्ती तरी तुम्हालाही तशाच प्रकारची मदत करतील असे आपण गृहीत धरून चालतो.
पण प्रत्यक्षात असे घडेलच असे सांगता येत नाही! कोणत्या प्रसंगी कुणी कुणाशी कस
वागाव यावर तुमचे नियंत्रण कसे असू शकेल? तुम्ही वेळेची गरज ओळखली हा तुमचा
चांगुलपणा ( का वेडेपणा? ) असतो. तशाच वागण्याची अपेक्षा कुणाकडून ठेवणे हा अजून
एक गाढवपणा ठरतो. थोडक्यात काय तुमची ओझी तुम्हालाच वाहायची आहेत!
No comments:
Post a Comment