फार फार वर्षांपुर्वी एका जंगलात एक वाघ एक पोपट व एका गाढवाची गाढ मैत्री होती.ते कायम बरोबरच रहात.एक क्षणही ते एकमेकाशिवाय राहू शकत नव्हते.एकदा पोपट आजारी पडला.वाघ व गाढवाने पोपटाची खुप खुप सेवा केली पण पोपट वाचु शकला नाही. वाघाला व गाढवाला फार दु:ख झाले. वाघाने तर दगडावर डोके आपटून आपटून आपला जीव दिला.आपले दोन्ही मित्र या जगातून गेल्याचे पाहून गाढवानेही डोके आपटून जीव दिला.देवाने या तिघांचे गाढ प्रेम पाहून स्मरण म्हणुन त्या जागेवर एक झाडाला जन्म दिला.तेच मोहाचे झाड! हुशार माणसाने या झाडापासुन एक पेय (ड्रिंक) बनवले व त्याला मदिरा (दारू) असे नाव दिले! हे पेय पिल्यानंतर आपण पाहतोच की, माणसाचा पोपट होतो व तो पोपटासारखा मिठू मिठू बोलायला लागतो! वाघासारखा डरकाळ्या फोडतो तर शेवटी गाढवासारखा गडबडा लोळतो !
..........संपादन-प्रल्हाद दुधाळ.
No comments:
Post a Comment