Thursday, November 8, 2012

सुसंवाद - यशस्वी विवाहाचा पाया.


सुसंवाद - यशस्वी विवाहाचा पाया.



  भारतीय संस्क्रुतीमधे एकूण सोळा संस्कार सांगीतले आहेत त्यापॆकी विवाह हा माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा संस्कार आहे.विवाहामुळे भिन्न संस्कार,भिन्न परिस्थितीभिन्न कल्पना यात वाढलेले तसेच जीवनाकडून विविध अपेक्षा  आकांक्षा बाळगून असलेले दोघे एकमेकाशी कायमचे जोडले जातात.विवाहामुळे खरं तर दोन कुटूंब एकमेकाशी जोडली जातात.प्रत्येकाने आपल्या जीवनात विवाहोत्तर जीवनाबद्दल काही रंगारंग स्वप्ने पाहिलेली असतात.आपले वैवाहिक जीवन हे सुख सम्रुध्दी  आनंदात असावे असे प्रत्येक जोडीदाराला वाटणे हे साहजिक आहे.पण सुखी संसाराची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकतेआणि येथेच गाडी अडते!
   एका वधुवर सुचक संस्थेत लिहिलेले वाक्य मला खुप आवडते."तडजोडी शिवाय विवाह नाही!" लग्नानंतर च्या बदलत्या जीवनाचा/तड्जोडींचा स्वीकार करण्याची तयारी आधी केलेली नसेल तर ती लग्नानंतरच्या विसंवादासाठीची ठिणगी होऊ शकतेत्यासाठी विवाहापुर्वीच मानसिक तयारी करणे आवश्यक असते.विवाहपुर्व समुपदेशन हा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
   यशस्वी विवाहोत्तर जीवनासाठी कुटूंबामधे सुसंवाद असायलाच हवाकिंबहुना यशस्वी विवाह हा परस्पर विश्वास आणि सुसंवादावरच उभारलेला असतोसंसारात अनेक सुख-दुख:चे प्रसंग येतात.आनंदाचे क्षण तर जल्लोषात साजरे केले जातात पण एखादी समस्या आल्यानंतर कायजेंव्हा समस्या उभ्या राहतात तेंव्हा गांगरुन  जाता समस्येचा स्वीकार करून त्यावरच्या तोडग्यांवरच्या विविध पर्यायांवर कुटूंबातील प्रत्येकाशी चर्चा  संवाद साधला तर अनेक पर्याय समोर येतात  मग सर्वानुमते घेतलेला निर्णय समस्येचे निराकरण अगदी सहजतेने करू शकतोविवाहोत्तर नाती ही एकमेकाला त्यांच्या गुण-दोषांसहीत सांभाळत फुलत ठेवायची असतात.जोडीदाराची जवळची माणसे,जोडीदाराची स्वप्ने,गुण,दोष,यश,अपयश,जीवनातले चढ-उतार,आजारपण,आशा,निराशा.... सर्व त्याच्यासोबत बरोबरीने वाटुन घेऊन  आपलेच समजुन एकमेकाला सावरतसमजुन घेत केलेला प्रवास म्हणजेच तर सहजीवनयशस्वी सहजीवनात प्रत्येक जोडीदाराने आपल्या बरोबरच जोडीदाराच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करायलाच हवा.कोणताही प्रश्न वयक्तीक प्रतिष्ठेचा  करता एकमेकांच्या आत्मसन्मानाचा/अवकाशांचा पुरेसा आदर ठेऊन केलेला सुसंवाद नेहमीच जीवनातल्या आनंदास कारण होत असतो.
अशा विवाहांतून फुलते एक उत्तम सहजीवनउभा रहातो एक यशस्वी  आदर्श संसार!
भिन्न भिन्न स्वभाव,समंजसाचा तेथे अभाव,
शब्दांचे घणाघाती घाव,कुचकामी असा संसार!
नसावी ती "ची बाधा,महत्व सदैव सुसंवादा,
आत्मसन्मानास नको ठेचतोच सुखी संसार!
एक दुस-यास सावरावेदोषांसहीत स्वीकारावे,
सुसंवादातुन साधणे हीतआनंदी होईल संसार!
                                                                          
    ..........प्रल्हाद कों दुधाळ.
           / रूणवाल पार्क,
            पुणे-३७.
            ९४२३०१२०२०.