Thursday, March 12, 2015

गरीब.

एकदा एका गर्भश्रीमंत माणसाने आपल्या शाळेत शिकणार्या मुलाला गरीबी  म्हणजे काय असते  ते दाखवायचे ठरवले.त्यासाठी तो त्याला घेवुन गरीब लोक रहात असलेल्या वेगवेगळ्या वस्त्यामधे दिवसभर अगदी अंधार होइपर्यंत  फिरला.संध्याकाळी घरी परत आल्यावर त्या गृहस्थ्याने आज दिवसभर जे काही  पाहिलेस ते तुझ्या शब्दांत लिहुन काढ असे मुलाला सांगीतले.मुलाने दिवसभर जे निरिक्षण केले होते ते वहीत लिहुन काढले ....
"आज मला माझ्या पप्पानी वेगळे जग दाखवले.मला दिसले की ...
1.आम्ही एक कुत्रा पाळला आहे पण या लोकांकडे अनेक कुत्री मांजरे शेळ्या गायी म्हशी अशी जनावरे आहेत.मोकळ्या हवेत मुक्तपणे ते प्राणी फिरत होते.
2.आमच्या घरी स्विमिंग पूल आहे पण तिकडे तर अख्खी नदी आहे.
3.आमच्या घरी रात्री दिव्यांचा झगमगाट असतो पण तिकडची माणसे मस्त चंद्रप्रकाशात रहातात.ग्रह व तारे वर मस्त चमचम करत असतात.
4.आम्ही फ्रिजमधील फळे व भाजिपाला खातो तिकडे डायरेक्ट झाडावर व शेतातुन या गोष्टी मिळत होत्या.
5.आम्ही खुप छोट्या घरात रहातो त्यांची छोटी घरे मोठ्या मोठ्या शेतावर  बांधलेली होती .
6.आमच्या घरी प्रत्येकाला वेगळी खोली आहे तिकडे सगळेजण एकाच घरात एकाच खोलीत राहुन धमाल करत होते.
7.मी पी सी वर गेम खेळतो पण तिकडची मुले जीवंत मित्रांबरोबर मस्त खेळत होती.
8.आमच्या घरी अन्न एकतर बाहेरून विकत आणतात किंवा कुणा नोकराने तयार केलेले अन्न आम्ही खातो पण तिकडे तर माणसे स्वयंपाक स्वत: करतात.
9.माझ्या मम्मी व पप्पाना माझ्यासाठी अजिबात वेळ देता येत नाही पण तिकडे सगळेजण कायम बरोबरच असतात.
10.पप्पा कायम म्हणत असतात की खुप पैसा असला की सुख आणि आनंद आपोआप मिळतात पण मग तिकडचे लोक तर आधीच आनंदी व सुखी दिसले.बहुतेक यामुळेच ते पैशामागे धावत नसावेत!
थॅंक्यु पप्पा, आज मला तुमच्यामुळे  समजले की तिकडचे लोक किती श्रीमंत आहेत आणि आम्ही किती गरीब आहोत!"
.......प्रल्हाद दुधाळ  pralhaddudhal.blogspot.com
   ( एका इंग्रजी बोध कथेचे मी केलेले स्वैर भाषांतर.)

No comments:

Post a Comment