Tuesday, March 17, 2015

फेसबुक व व्यक्तीमत्व विकास

फेसबुक व व्यक्तीमत्व विकास
फेसबुक या सोशल नेटवर्क ने आज आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान मिळवले आहे.मी फेसबुक वर आलो ते एका वेगळ्याच कारणासाठी! माझा मुलगा इंजिनरिंगला शिकत होता आणि त्याचे  बरेच मित्र fb वर असल्याचे तो सांगत असे .मी त्याच्याकडुन fb बद्द्ल माहीती घेतली व माझेही अकाउंट सुरू केले अर्थातच पहिली फ्रेंड रिक्वेस्ट मुलालाच पाठवली.झाले काय की fbमुळे मला बसल्या जागेवर  आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत, मैत्रीणी कोण आहेत, त्यांच्यात कोणत्या प्रकारची चर्चा होते इ इ माहीती मिळू लागली.हळू हळू मला माझे काही जुणे  मित्रही  fb वर भेटले. काही कविता मी पोस्ट केल्या त्यावर अनेक ओळखीच्या तसेच अनोळखी  मित्रांच्या likes वा कोमेंट मिळत असत.यामुळे एक लक्षात आले  की आपण जे काही बरे वाईट लिहितो ते  लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक प्रभावी साधन fb च्या रुपाने उपलब्ध झाले आहे! व या सोशल  नेटवर्क चा या योग्य कारणाकरता वापर करण्याचा संकल्प केला.अनेक साहित्यिक गृप्स चा मेम्बर झालो. एका क्लिक वर  लिहिलेल्या कविता वा लेख  लोकांपर्यंत पोहोचू लागल्या त्यावरच्या प्रतिक्रिया मिळू लागल्या त्यामुळे अर्थातच लिहिण्यातले सातत्य वाढले .लिखाणातली सफाई वाढली अजुन खुप काही साध्य करता येईल असा आत्मविश्वास वाढतो आहे. अनेक साहित्यिक,  नाट्य कलाकार, चित्रकार, गायक,वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, उद्योगपती,राजकारणी लोक इत्यादि  फेसबुक मित्र म्हणुन लाभल्यामुळे  त्या त्या क्षेत्रातले अनुभव शेअर होतात ते मन लावुन वाचले जातात .यातुन आपले व्यक्तीमत्व  समृध्द होत आहे. या बरोबरच फेसबुक च्या माध्यमातुन  एखाद्याप्रती मनात असलेल्या भावना अगदी हव्या त्या स्वरूपात त्या व्यक्ती पर्यंत पोहोचवणे अगदीच सोपे झाले.शुभ प्रसंगी शुभेच्छा देणे.प्रसंगी सांत्वन करणे .कौतुक करणे सहज शक्य होत आहे . व्यक्त होण कधी नव्हे तेव्हढ सोप्प झालय.
  अर्थात प्रत्येक गोष्टीचे जसे काही फायदे असतात तसेच काही दुष्परिणामही असणारच! कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर केला तर तो व्यक्तीमत्वाला मारकसुध्दा होवू शकतो, हे दुधारी शस्र आहे याची जाणीव तर नक्कीच असायला हवी.योग्य कारणासाठी ,योग्य प्रमाणात जर वापर केला फेसबुक व्यक्तीमत्व विकासात महत्वाची भुमिका बजावू शकते हे नक्की !
......प्रल्हाद दुधाळ .पुणे .(9423012020)

No comments:

Post a Comment