Thursday, January 28, 2016

पानमळा ....स्मृतीमधला.

    पुर्वी माझ्या गावी पानमळ्याची शेती केली जायची.अत्यंत मेहनत व कुशल मनुष्यबळ लागणारे हे पीक होते.एकदा या नागवेली लावल्या की कमीत कमी सहा सात वर्षे फक्त या नागवेलींची काळजी घ्यायची.या मळ्यात सतत काही ना काही काम करावे लागायचे.प्रत्येक भागात वेगळी पध्दत असू शकते; पण आमच्याकडे जे पानमळे असायचे, त्यासाठी अत्यंत सुबक असे वाफे तयार केले जायचे .या वाफ्यांच्या कडेकडेने प्रथम शेवरीचे बी लावले जायचे, त्या बरोबरच पांगारा व शेवगाही मधेमधे लावत असत.मधे मोजकी पपयीची झाडे तसेच केळीसुध्दा लावत.नागवेलीच्या वेलीना वाढ झाल्यावर बिल्कूल उन्हाचा चटका लागू नये म्हणून ही तजवीज केलेली असायची . या बरोबरच पूर्ण मळ्याभोवती वाऱ्यापासून संरक्षणासाठी गवताच्या किंवा वैरणीच्या ताट्यांचे कुंपण केले जायचे . शेवरीची ही झाडे थोडी मोठी झाली की नागवेलीचे छोटे छोटे वेल आणून प्रत्येक शेवरीच्या झाडासोबत समान अंतरावर नागवेल लागवड व्हायची.या पानमळ्याला दर तिसर्या - चवथ्या दिवशी पाणी द्यावे लागायचे. प्रत्येक वाफ्यात काळजीपूर्वक ठराविक पाणी द्यावे लागायचे .एकदा वेल वाढायला सुरू झाले की हे वेल शेवरीच्या झाडाला वाळलेल्या लव्हाळ्याच्या पाण्यात भिजवलेल्या काडीने, जी अगदी सुतळी सारखी वापरता यायची,बांधायचे. साधारणपणे दर चार पाच इंच अंतरावर अशा प्रकारे वेल बांधला जायचा.हे बांधणीचे कामही अत्यंत कौशल्याचे असायचे.नागवेल हळू हळू वाढत जायची. या वेलाना वेळेत पाणी देणे व बांधणी करणे या गोष्टी करत राहीले की वेल अगदी जोमाने वाढायचा. या वेलींवर गर्द हिरवीगार व आकाराने तळहाताएवढी पाने यायची .पानाची ठराविक प्रत  व  रंग तयार झाला की पानांची खुडणी चालू व्हायची.यासाठी तयार केलेली स्पेशल पत्र्याची नखे मिळायची.ही नखे आपल्या हाताच्या नखावर लावून नाजुकपणे पानांची खुडणी केली जायची.पानांच्या प्रती प्रमाणे त्यांची नावे असायची . मला आठवणारे प्रकार म्हणजे कळीची पाने ,जुनवाण पाने ,गबाळ पाने .त्यातल्या कळीच्या पानाला मंडईत चांगला भाव मिळायचा.पानाची खुडणीचे कौशल्यपूर्ण काम  बघण्यासारखे असायचे .दोन हातात पत्र्याची नखे लावून अत्यंत सफाईने एक एक पान खुडायचे ते तसेच हातात ठेवून पुढचे पान खुडायचे.खुडणी करता करता पानांची संख्या व साईझ यावर लक्ष ठेवले जायचे.न मोजता हातात मावेल एवढ्या पानांच्या गठ्ठ्यावरून एक एक शेकडा पाने एका रेषेत लावून केळीच्या पानावर हारीने मांडून ठेवली जायची.हे काम अत्यंत वेगाने व्हायचे .खुडणी करणार्या लोकांच्या हातातले हे कसब अगदी पहाण्यासारखे असायचे.पाचशे पानांच्या एकत्र गठ्ठ्याला कवळी म्हणायचे.ही पाने अत्यंत कौशल्याने केळीच्या ओल्या खुंटाचे व पानांचे  कव्हर करून गोल पॅकिंग करायचे ते पार्सलही पहात रहावे असे असायचे.
(अशा पाच हजार पानांच्या पार्सलला एक विशिष्ट नाव होते ते मला आता आठवत नाही.)पहिल्या खुडणीच्या अशा पार्सल ची बैलगाडीतून गावात ढोल वाजवत मिरवणूक काढली जायची.
हा माल पुणे मुंबईच्या दलालाकडे विकला जायचा.वर्षभर अशी वेगवेगळ्या प्रतीच्या पानाची खुडणी व पाठवणी झाल्यावर साधारणपणे एप्रिल मे महिन्यात वेल रिकामे व्हायचे मग उतरणीचे काम व्हायचे .उतरण म्हणजे शेवरीच्या झाडाना बांधलेले वेल सोडवायचे व वाफ्यात सलग चर खोदून एका विशिष्ठ पध्दतीने गोल करून फक्त वरचा शेंडा वर ठेवून मातीत काळजीपुर्वक पुरायचे.पुन्हा पाण्याची आवर्तणे द्यायची वेल वाढले की बांधणी पाने आली की प्रतावारी प्रमाणे खुडणी असे वर्षभराचे रूटीन करायचे .गावात जवळ जवळ प्रत्येकाच्या शेतात थोड्या क्षेत्रात का होईना हा पानमळा असायचाच .कालपरत्वे पुढच्या पिढ्यांकडे हे पानमळा शेतीचे कौशल्य आले नाही.एकूणच हे अतिकष्ट व कौशल्य लागणारे पीक घेणे बंद झाले आणि वीर परिंचे परिसरातील आमच्या गावचे चविष्ट पान व ते पिकवणारे हिरवेगार व बारमहा थंड सावली देणारे पानमळे व ते पिकविणारे ते हात इतिहासजमा झाले!
आज गावातल्या नव्या पिढीला कधीकाळी इकडे पानाची शेती केली जायची हे माहीत सुध्दा नसेल ....
..... प्रल्हाद दुधाळ.

Sunday, January 3, 2016

एक चर्चा – एकच अपत्य –योग्य की अयोग्य

एक चर्चा – एकच अपत्य –योग्य की अयोग्य
Jayant Joshi
एक जरा वेगळा विषय.......नेहमीच विनोदी किवां त्या लिखांण्याचा नको........आज एक प्रश्न आला डोक्यात.......एक बाप या नात्याने......एकच मुलगी किवा मुलगा असणे.......हा निर्णय ज्यांनी घेतला ...कधी त्यांना जाणवलं का चुकलो आपण...किवां जाणवलं का कधी असे पण......मला तर आजकाल जास्त जाणवत ......मुलगी मोठी झाली .......कोणाजवळ भावना व्यक्त करत असेल ..........प्रश्न पडतो.....तिच्या बोलण्यातून ....ती खेळताना....ती वाचताना.........ती बोलताना....खूपदा आजकाल जाणवत .......सांगयचे असत तिला काही तरी ........मग ती बोलते तिच्या आई जवळ.........एक मैत्रीण समजून ......तरी वाटत खूप काही अजून बोलली असती.........तिला भाऊ किवा बहिण असती तर.....तुमचे काय मत आहे यावर.......???? ( कृपया विषय गंमतीने घेऊ नका हि विनंती )
जयंत...........
Bharat Darade मला पण मुलगी आहे, पहिल्यापासून तिचा मित्र बनून रहा, सर्व नाही पण खूप जास्त मन मोकळं करेल तुमच्या जवळ
Jayant Joshi ते तर मी तिचा मित्र आहे..........पण तरी जाणवत खूप दा
सं जय पहिल्यापासून ऐकून घेतले की मुलगी ही मैत्रिण बनते...
होतं काय की आपण आपल्या कामात बिझी असतो आणि जेव्हा मुलं आपल्याला सांगायला येतात तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो..
हळूहळू मुलांना आपल्याला यात काही रस नाही असे वाटून ते त्यांचा दुसरा मित्र शोधतात. अर्थात ती आई असते...
मी सुद्धा काही दिवस कामामुळे लक्ष देत नव्हतो... मग हळूहळू जाणवलं की चुक आपलीच आहे...
अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण लक्षात येत नाहीत
Jayant Joshi एकदम खर आहे संजय........होते असच......मी मुलीला खूप वेळ देतो तरी पण जाणवत........
Gajanan Kadam मुलांना सोबत असावी...
होईल हो सर्व निट
सं जय 
मुलांच्या संख्येपेक्षा नात्यातला गोडवा टिकवणे जास्त महत्त्वाचे आहे.
चुलत भाऊ, मावस भाऊ ही नाती जास्त लांब जाऊन द्यायची नाही.
एकत्र कुटूंबपद्धती टिकवता आली पाहीजे
Gajanan Kadam मुलं असतील तरच
नाती तयार होतील अन टिकतिल की राव...!
संख्येच च नका घेवुन बसु तर ...See More
Gajanan Kadam आधी घरातील नाती सांभाळू मग
बघू चुलत अन मानलेली...
सं जय आम्ही आता घरात दहा जण आहोत..
आई -वडील, दोन मुले त्यांच्या बायका, त्यांना प्रत्येकी दोन मुले मुली.
वडिलांनी घराला एकत्र बांधून ठेवलंय म्हणून सर्व अजूनही एकत्र आहोत. काका, आत्या सुद्धा अगदी नेहमीच जवळ असतात.
Gajanan Kadam गोकुळ आहे तुमचे... छान 
सं जय हां हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे...
परंतू यातही एक गोष्ट करता येते...
माझ्या बहीणीच्या सासऱ्यांनी केली आहे म्हणून सांगतो..
बहीणीचे सासरे आणि त्यांचे 2 भाऊ, भले वेगवेगळे राहत असतील तरी घरचा पुर्ण व्यवहार एकत्र करतात..
छोट्या छोट्या गोष्टीत नाही पण गाडी घेणे, दागिने करणे, लग्न, वाढदिवसाचा खर्च वगैरे एकत्र करतात. वेगळे राहून एकत्रपणा जपलाय त्यांनी...
पण त्यासाठी मुख्य माणूस खंबीरच हवा हे मात्र नक्की
Gajanan Kadam बरोबर...
Geeta Kourwar Balshetwar दोन हवीत असे माझे मत आहे
Vaishnavi Shrikant Deo Just one child is an incomplete family (We are also sailing in the same boat). Too late to regret.
Jayant Joshi ya ...........same problem ...........when it comes to know ........its was too late .............no option other than acceptance for reality.........thanks for good comments
Harshad Barve आर्थिक गणित फार महत्वाचे असत या निर्णयात
Ulhas Ratnaparkhi खरे आहे...परंतु...
आर्थिक गणितापेक्षा नाते फार महत्वाचे आहे आणि आहे त्या कमाई मधे भागवून 2 मुले असणे आणि त्यांचे योग्य संगोपन करणे गरजेचे आहे....
Jayant Joshi हर्ष....ते गणिताच्या भीतीने तर नाताचे गणित चुकल..........तू बरोबर बोलतो मित्रा
Smita Gujare Varpe Agree with harshad...
Raja Joshi मलाही पहिली मुलगी आहे. आम्हीसुद्धा विचार केला की एक बस. पण ज्या डाँक्टरांकडे आम्ही तिला नेत होतो, त्यांनी आमचे तासभर बौद्धिक घेतले. ज्या प्रमाणे मुलांना आपल्या गोष्टी शेयर करायला भावंड लागते, त्याचप्रमाणे भावंडामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट वाटून घ्यायची सवय लागते जी त्यांना भावी आयुष्यात खुप उपयोगी पडते. त्यामुळे आम्ही दुसर्या अपत्याचा निर्णय घेतला.
Rajendra N. Kalokhe मला तीन मुलं आहेत सगळ्या गोष्टीत आनंद घेत असतात आमची गरज नाही पडत त्यांना आम्हाला फक्त त्यांची भांडणे सोडवणे येवढे च काम असते पण खुप मज्जा येते ...जर घरात नसतील तर घर नुसते खायला उठते..
Jayant Joshi राजू.............खर आहे...........छान लिहिले तू मित्रा
Gajanan Kadam क्या बात है...
Rajendraji...
मला दोन मुले
मोठा मुलगा ८ वी व् मुलगी २ री मध्ये आहे...
Rajendra N. Kalokhe माझा मोठा 10 वी आणि नंतरची जुडवा आहे ते 2 nd ला आहे
पांडुरंग जगन्नाथ मरेवार लेकरांच बालपण हरवतं असं मला वाटतं... समवयस्क वेगळे असते...आई वडील म्हणून लेकरासोबत तुम्ही काही वेळा साठी लेकरू होऊ शकता पण त्याला एक पूर्णवेळ सोबती हवा असतो. संगतीने बरंच बालपण जगता येतं ते एकट्या लेकराला जगता येत नाही किंबहुना मिळतच नाही. #माझं_मत
Harshad Barve लगन झाल का रे भाऊ तुझ
Jayant Joshi पांडुरंगा...........तु नको असा चुकीचा निर्णय घेऊ पुढे आयुष्यात.........
पांडुरंग जगन्नाथ मरेवार नक्कीच... मी योग्य तेच पाऊल उचलेन... आणि असही तुम्हा सर्वांची साथ इतक्या लवकर नाही सॉरी आजन्म नाही सुटायची. वेळोवेळी मार्गदर्शन जीवनासाठी घेतच राहीन. धन्यवाद Jayant जी... सुदंर विषय मांडल्याबद्दल smile emoticon
Jayant Joshi पांडुरंग जगन्नाथ मरेवार ..............स्वागत आहे........फक्त भेट आठवणी ने मला १६ ला............न विसरता...........
पांडुरंग जगन्नाथ मरेवार नक्कीच ओ... आवश्य भेटणारच... smile emoticon __/\__
अनिता जे. वाघ Hach vichar Karun me dusarya aptyaxha vichar kela
अनिता जे. वाघ Gharat vatavaran khelimelich asel tar mul aplyakade pan chhan vyakt Hotat, pan Kahi Kahi gosti asatat jya te aplya bhavnda sobatach share kartat
पंडित पॉटर त्यावेळी घेतलेले निर्णय आता चुकीचे वाटतात. पण काय करता, मलाही एकच मुलगा आहे. त्यालाच मित्र करून टाकलाय. मस्त जमतं आमचं.. smile emoticon
Jayant Joshi दादा................हो खर आहे तुमच
Mandakini Raskar खरं आहे अगदी !! जुनी लोकं उगीच नाही म्हणत , " एकाला दुसरं जोडीला होऊन द्या !! " त्यांनी जग जास्तच पाहिलेलं असतं , अनुभवलेलं असतं म्हणुणच ते सांगतात . पण नविन पीढीला हे पटत नाही , कळत नाही !! आणि जेव्हा लक्षात येते तेंव्हा उशिर झालेला असतो . Jayant Joshi ताई................खर आहे तुझे..........नक्कीच
Mandakini Raskar smile emoticon माझी मुलं त्यांच्या फ्रेंडसना सांगतात , " माझी मम्मीच माझी पहिली सर्वात जवळची मैञिण आहे !! tongue emoticon
Shripad Rane मलाही एकच मुलगी आहे...आईशी खुप जमत ....फक्त भुक लागली की बाबा ...बाकी आईच संभाळते सार....दुसर्याचा विचार आता शक्य नाहीये...
Ram More अभिव्यक्ती हि लिंगावर अवलम्बुन नसते मुळात...फक्त मुलगा असेल तर तो पण आपलया भावना मित्राबरोबर शेअर करीतच असतो,मुलिच्या बाबतित तेच ! इथे मेल/फिमेल अशी तुलना करु नये (माझे वैयक्तिक मत)...
भारती गायकवाड किमानएका घरात दोन मुल हवीच. एकट मुल हे बाकिच्यात मिक्स होतांना संकोच घेत. जरास एंकलकौडा स्वभाव होतो. आपण दिवसातले चोवीस ताई मुलांना नाही देऊ शकत. काही वेळेला प्रसंग म्हणा गोष्टी म्हणा अशा असतात त्या आई वडीलासोबत शेअर करता येत नाही तिथ भांवडारुपी मिञ मैञिण हवी असते. घरच नात भक्कम असल कि, माणुस बाहेरचा आधार शोधत नाही.
Jayant Joshi एकदम सहमत आहे मी तुझा सोबत या विचारावर
भारती गायकवाड एकट मुल सांभाळता तारेवरची कसरत असते. आई, बाप, मिञ, मैञिण, भाऊ, बहीण म्हणुन आपण कूठेतरी कमी पडतो दादा.
रमेश भि. उदमले अगोदर ठरवले एकच...
मुलगा झाला...
ती हटुन बसली म्हणाली...
मला मुलगी पाहिजे...
झाली मुलगी...
मस्त खेळतात दोघेजण
Rajendra N. Kalokhe मी माझ्या आई वडिलांना एकटाच आहे त्या मुळे माझी आई नेहमी म्हणत असते बाई एकच डोळा आणि जीव गोळा...त्या मुळे मी 3 होऊ दिले ....आता मी म्हणतो हीच खरी दौलत..
Manisha Jadhav Waghe मला एकच मुलगी…… घराची स्तिथी बेताचीच होती,ज्यॉब करणं गरजेचं होत पण माझ्या लेकीला वेळ देत यावा म्हून मी जोब नाही केला घरगुती tutions घेत राहिले…. तिला जमेल तसा वेळ देत गेलेजेव्हा ती नववीला गेली तेव्हा मी tution घ्यायचं बंद केलं कारण त्या वेळी तिला ...See More
Jayant Joshi मनीषा............मस्त लिहल.........एकदम खर आहे तुझे ..........तरीपण खूप दा जाणवत मला तरी.........
Manisha Jadhav Waghe माझ्या लेकीला भावंड नाही याची खंत असायची ,,,,, म्हणून त्या वर उपाय केला चुलत भावंडात माया प्रेम राहील अस वातावरण तयार केलंमोठ्यानं मध्ये किती हि समज गैरसमज जरी झाले तरी या भावंडान मध्ये कधी त्याचा फरक पडत नाहीदर रविवारी आमच्या घरी या सर्व भावंडांचा गोंधळ असतो
संजय द. सोमवंशी-पाटील ये बात एकदम सही है...

Vasundhara Valsangkar Minimum
दोन तरी अपत्यं असावीत ... मग ते कोणीही असेल ...
एकमेकांना भावनिक आधार मिळतो यासाठी ...
Kavita Mahajan हो मला वाटत आपण कितीही त्यांचे मित्र मैत्रीण बनलो तरीही समवस्क त्याना हवे असावेत. आपल्यापेक्षा ते त्यांच्या वयाच्या मुलांसोबत जास्त शेअर करत असावे. आपल हक्काच कुणी असाव त्याना .. शेवटी रक्ताच नात असत ते
Jayant Joshi हो.........तेच तर नसत मग........
Kavita Mahajan त्यांचे best frnd कोण आहे ते शोधा
Jayant Joshi माझी एक कविता आहे यावर..........बाबा मी का बर आहे एकटी....??????
Vaidehi Chilka एक मूल नसावे ह्या मताची ...खूप च फरक पडतो एक मूल असणे नी दोन भावंड असण्यावर ...यावर खूप मोठा लेख लिहिता येईल ..एक मानसोपचार तज्ञ म्हणून ...एवढेच सांगू शकेन की आई वडील प्रत्येक वेळी किंवा वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक साथ जरी देऊ शकत असले तरी वैचारिक भिन्नता ही असतेच ..त्यासाठी त्यांना एक भावंड म्हणून च मित्र असले तर बऱ्याच गोष्टी सुसह्य होतात ..
Vaishnavi Shrikant Deo I slightly disagree with lot of comments. A parent cannot be a friend, one has to keep a certain distance. Of course one should keep a good eye and know what is going on in their minds but there has to be certain 'dhaak'. A parent cannot , in fact should not gossip with your child. We don't even share the same songs . I cant understand the songs that he likes. He thinks of us as 'Mohenjo-Daro and Hadappa'
संजय द. सोमवंशी-पाटील Absolutely...
Straight forward & 95% correct...
(Generation gap)
आशा नवले mala ekach mulgi kadhi nahi janvat nirnay chukicha hota.tila kay bolave vatel te sagale bolte maza barobar agadi chotya chotya gosti ti shear karte.tila ti ekati ahe yachi kadhi janiv pan nahi hot.ayishay samjdar mulgi .ek sundr god gift ahe .
अर्चना चंद्रसेन मला एकच मुलगी, पण मित्रमंडळी खूप आहेत तीला, एकटेपण जाणवतच नाही तिला
Pralhad Dudhal मला एकच मुलगा आहे.आम्ही दोघे नोकरी करणारे. आपण पुरेसा वेळ देवू शकत नसल्याने लहान मुलाचे हाल होतात हा अनुभव असल्यामुले एकावरच थांबलो. तो एकटा पडू नये म्हणून आम्ही त्याला जाणीवपूर्वक चुलत, मावस, मामे भावंडाबरोबर ठेवले लहानपणी दिवसभर आज्जी आजोबा बरोबर मामांबरोबर रहायचा. सर्वजण त्याची नको एवढी काळजी घ्यायचे. चांगले संस्कार व् शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आज तो कुशल सॉफ्टवेयर इंजिनअर आहे त्याचे लग्नही झाले आहे. मागे वलून पहाताना मला वाटते की आम्ही एक अपत्य असण्यामधले फ़क्त तात्पुरते फायदे बघितले व् भविष्यातल्या दुष्परिणामाकडे दुर्लक्ष झाले.त्याची काही कारणे- अति लाडात व् वाढवताना घेतलेल्या अति काळजी यामुले तो स्वतंत्रपणे काही निर्णय घ्यायची वेळ आली की डगमगतो. आरोग्याच्या बाबतीत तो अतीसंवेदनशील झाला.सहनशक्तीचा विकास होवू शकला नाही. तडजोड करण्याची सवय झाली नाही. आपले निर्णय जसे लहानपणी घरातले वडीलधारे घेत होते तसेच आत्ताही व्हावे असा स्वभाव झाला. स्पून फीडीगची सवय झाली. घरातल्या जबाबदार्या टाळण्याची् वृत्ती अंगी आली. थोडक्यात या सवयी लावण्यात पालक म्हणून आम्ही कमी पडलो! ओफिसमधे कामात त्याची कितीही हुशारी असली तरी स्वत:च्या संसारात ती हुशारी वापरण्यायोग्य कौशल्य आत्मसात होवू शकले नाही. थोडक्यात व्यवहारी जगात वावरताना एक गृहस्थ्य म्हणून तो नालायक ठरत आहे.चुलत मावस वा मामे बहीणवाभावांशी त्याचे जे नाते मी अपेक्षिले होते तसे पुढे राहीले नाही.कोलेज जीवनातले मित्र दुरावल्यानंतर जीवाभावाचे नविन मित्र मैत्रीणी जोडण्यात तो कमी पडतो आहे.सख्खे भाऊ किंवा बहीण असती तर खुप फरक पडला असता असे प्रकर्षाने वाटते!
Kanchan Nilesh Bhave मला एक मुलगी आहे,पण मला दुसरे मूल नक्कीच हवे आहे
मुलांची मानसिक वाढ आणि sharing साठी हे गरजेचे आहे
आम्ही दुसरे मूल दत्तक घ्यायचा विचार करतो आहोत
बघू अजून या विषयावर बोलणे नाही झाले घरात पण दुसरे मूल हवेच

मुलीचे संगोपन आणि तिला वेळ देता यावा म्हणून मी पूर्ण वेळ गृहिणी आहे(engineer आहे मी आणि माझे coaching clasess होते)
कॅन्डल्स बिसनेस करते पण आवड म्हणून
Jayant Joshi दुसरे मूल दत्तक घेणे............हा तुमचा निर्णय खरच हिम्मतिचा आणि अभिमानस्पद आहे...............गुड......आणि थान्क्स छान लिहल तू कांचन...............
अनिता जे. वाघ Kanchan dattak mul ghenyacha nirnay kharach koutukaspad ahe. Pan tu swatach mul ani dattak mul hyana saman nyay deu shakshil ka
Datta Shinde Jayant भाऊ , अगदी खर आहे, हि गोष्ट मलाही हल्ली जाणवतेय. मला एकच मुलगी आहे , जो पर्यंत लहान होती तो पर्यंत घरात घरभर फिरताना , खेळताना कधी नाही जानवल पण आता , मनमोकळे करण्याकरीता भावनिक आधाराकरीता एकटीचा कोंडमारा होतो असे वाटते. मुलांच्या आई वडिलांशी बोलताना , भावना व्यक्त करताना काही मर्यादा येतात असे मला वाटत.
एखाद भावंड असायला हव अस माझ मत आहे
Jameer G. Shaikh Pralhad Dudhal सरांनी अगदी विस्तृतपणे मांडले आहे..
त्यांच्या निकषांशी मी पूर्णपणे सहमत आहे..
Chetan Patwari २ मुलं असावीत या मताशी सहमत 
Amey T Sonawane दोन असावी रे जयंता !
उदय गोविंदराव दैठणकर Pralhad Dudhal जी तुमच्या प्रांजळ कबुलीने...खुपच छान मार्गदर्शन झाले...!
मी पण आज अनुभवतोय...पहिल्या मुलीनंतर तब्बल 8 वर्षांनी निर्णय घेतला..! खुप आनंद होतोय..आणि मुलगी पहिल्या पेक्षा खुपच समजुतदार झाली आहे....ताई झालिये ना ती ! smile emoticon
Pralhad Dudhal उदयजी या निमित्ताने मनात असलेल्या गोष्टी लिहिल्या गेल्या.कुबेर गृप चे हेच वेगळेपण आहे!